वरोरा शहरातील गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे.

वरोरा शहरातील गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे.

गणपती मंडळाच्या स्वागतासाठी राजकीय पक्षांचे स्टॉल.
काही ठिकाणी एकाच राजकीय पक्षाचे दोन स्टॉल
वरोरा
चेतन लूतडे 

शनिवारी सकाळपासून वरोरा शहरातील गणपती विसर्जनाला सुरुवात झाली होती .वरोरा येथील मध्यभागी असलेल्या तलावामध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहेत. यासाठी वरोरा शहरातील राजकीय पक्षांनी स्वागतासाठी शामियाने  उभारले असून सर्व राजकीय पदाधिकारी यावेळी गणपती मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. वरोरा शहरातील मानाचा गणपती असलेला विठ्ठल मंदिर येथील गणपती तलावात विसर्जन करून शहरातील गणपतीची सुरुवात झाली होती.

भव्य ढोल ताशाच्या गजरात गणपतीची मिरवणूक वरोरा शहराच्या मध्यभागातून काढली गेली . मित्र चौक, डोंगरवार चौक ते आंबेडकर चौक या भागातून सर्व गणपतीची रांग लागलेली होती.  प्रत्येक गणपती मंडळाजवळ डीजे, भजन मंडळी, व ढोल ताशे वाजवत मंडळातील सदस्य मोठ्या उत्साहात नाचत होते. यावेळी वरोरा शहरात कमालीची गर्दी पाहायला मिळाली .

 जाजू हॉस्पिटल पासूनच पोलिसांनी गर्दी वळवली होती. लहान मुलांच्या खेळणी चे दुकाने सजलेली होती. माढेळी नाका, कृषी उत्पन्न बाजार समिती, उपजिल्हा रुग्णालय , लोकमान्य शाळेच्या रोडवरती जत्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. यावेळी हजारो दुकाने लागले होते व यांच्याकडून विविध स्वरूपाचे टॅक्स वसुली करणारे लोकही फिरताना दिसले. त्यामुळे बालगोपालांची खूप गर्दी लागली होती. सुट्टीचा दिवस आल्याने सहकुटुंब गणपती विसर्जनाचा आनंद घेत होते.

आंबेडकर चौक येथील तलावाचा प्रवेशद्वारावर गणपती विसर्जित करण्याचे  ठिकाण असून तिन्ही बाजूला लोकांनी गर्दी केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लागला असून यावर्षी वारलेस कम्युनिकेशन पोलिसांच्या  कानाला लागलेले दिसले. गणपतीच्या जवळ दंगामस्ती करत दिसताच युवकांना बाहेर काढून तंबी पोलीस देत होते . त्यामुळे महिलांना चांगल्या रीतीने ही मिरवणूक पाहता येत होती.
वरोरा शहरातील राजकीय नेत्यांचे स्टॉल पाहायला मिळाले प्रत्येक स्टॉल वरती राजकीय पक्षाची शक्ती दिसून येत होती. होल्डिंग ,पोस्टर्स आणि लाईव्हच्या  माध्यमातून जाहिरातीचा प्रचार मोठ्या प्रमाणात दिसून आला. काही राजकीय मंडळींनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांना भेटवस्तू सुद्धा दिल्या. यावेळी डोंगरवार चौक ते आंबेडकर चौक यादरम्यान युवकांचा जल्लोष मोठ्या उद्घानावर होता. डीजेच्या तालावर सर्व युवक गुलाल उधळत थिरकत होते. तर काही मदहोश होऊन आपल्याच तालात मागच्या गल्लीत गणपती विसर्जनाचा आनंद मनवत होते. मात्र यावर कोणाचाही अंकुश दिसून आला नाही. तर काही युवक सेल्फी घेऊन आपला आनंद व्यक्त करत होते. 
 निर्माल्य शिरवण्यासाठी नगरपालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली होती. गणपती विसर्जित करण्यासाठी तलावाच्या कमिटी तर्फे फी आकारण्यात आली होती. 
वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर , उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे सीओ, तहसीलदार यावेळी आवर्जून उपस्थित होते. काँग्रेस,भाजपा, ऊबाठा शिवसेनेचे शिंदे व जीवतोडे दोन गटाचे दोन पेंडॉल, शिंदे गट शिवसेना मात्र उपस्थित नव्हता, राष्ट्रवादीचे , काँग्रेस, प्रशासकीय यंत्रणा, किशोर भाऊ टोंगे, मुस्लिम बांधव, नगरपालिका,शिवसेना हेल्प सेंटर,अशा सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे स्टॉल स्वागत करण्याकरिता लागले होते.
ही मिरवणूक पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्त असून कोणतीही अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घेतली होती. दहा वाजता डीजे बंद केल्यामुळे युवकांच्या आनंदावर विरजण पडले होते.
वृत्तलिहेपर्यंत वरोरा शहरातील गणपती विसर्जन सुरू होते. 

Comments