सोयाबीन पिकाचे झालेले नुस्कानीची पाहणी पीक विम्यात सामील करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारने द्यावी.तसेच चालू शेतकरी यांना प्रोत्साहन पर रक्कम देण्यात यावी.


सोयाबीन पिकाचे झालेले नुस्कानीची पाहणी  पीक विम्यात सामील करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारने द्यावी.
तसेच चालू शेतकरी यांना प्रोत्साहन पर रक्कम देण्यात यावी.

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 
जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णता उध्वस्त झाले असून ठीक ठिकाणी मोर्चा आणि निवेदने शेतकरी देत आहे. यावर्षी शेतकर्यांनी मोठया प्रमाणात सोयाबीन पीक घेतले आहे मात्र काही दिवसा अगोदर मोझ्याक रोगाने थैमान घातले , त्यामध्ये पन्नास टक्के सोयाबीन पिकाचे नुस्कान झाले. लगेच दोन ते तीन दिवसात बुरशी सारखा रोग आला आणि पूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले.  नुकसान झालेल्या पिकाचे पंचेनामे करून पीक विम्यात सामावून घेऊन शेतकर्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारने करावी,  सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्पीयाला  विमा कंपनी सोबत संपर्क साधला आहे मात्र तो अजून पर्यंत शेतकर्याच्या नुकसानीचे  नोंद पिक विमा कंपनीने केलेले नाही. त्यामुळे सरकारने एक रुपया काढलेल्या विम्या मध्ये सामावून अनुदान द्यावे.
यासाठी ते टेंमूर्डा येथे नागपूर महामार्ग काही वेळापुरता अडवून मोर्चा करण्यात आला.

आपल्या महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी जाहीर केली मात्र याची यादी मधून काही शेतकरी यांचे नावेच नाही तर काही शेतकरी यांना अजूनही कर्ज माफिचा लाभ दिलेला नाही. सदर निवेदनाची दोन ते तीन दिवसात दखल घेऊन शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सोमवारी टेम्रूडा येथे शेतकरी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनाची सदर दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येत टाला ठोको आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. असे आवाहन किशोर डुकरे यांनी यावेळी केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                        

Comments