कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाजाला सरसकट देऊ नये.

कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाजाला सरसकट देऊ नये.

वरोरा
चेतन लूतडे वरोरा

दी.15/09/2023 रोजी वरोरा तालुका धनोजे कुनबी समाज मंडळ, वरोरा जि. चंद्रपूर यांच्या वतीने मराठा समाजास  कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या शासन निर्णयाचा विरोध करण्याकरिता मा. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म.रा. तथा मा. देवेंद्रजी फडणवीस व मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म.रा. यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले त्यावेळी  ॲड. गजानन बोढाले अध्यक्ष धानोजे कुणबी समाज, वरोरा, सचिव श्री. कौरासे सर, उपाध्यक्ष. श्री बंडूभाऊ देऊळकर, सदस्य. श्री बोबडे सर तथा ॲड. सोनटक्के साहेब,ॲड. संगीता आगलावे, ॲड. वनिता देठे, श्री पायधन, .ॲड.  श्री झाडे उपस्थित होते.
        

Comments