रोटरी क्लब वरोरा तसेच भारतीय सोशल फाउंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तान्ह्य पोळा नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन

रोटरी क्लब वरोरा तसेच भारतीय सोशल फाउंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तान्ह्य पोळा नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन 

वरोरा 15/9/23
चेतन लूतडे 
महाराष्ट्रात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा व ताणा पोळा उत्सव प्रत्येक गावाच्या चौकामध्ये ढोल ताशाच्या गजरात नंदीबैलाला सजवून पारंपारिक पद्धतीने मनवला जातो. यावेळी खेड्या गावांमध्ये तान्हा पोळ्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. लहान मुलांच्या लाकडी नंदी बैलांचे पूजन करून आकर्षक बक्षिसे दिल्या जाते.

जय भारतीय चौक वरोरा येथे ताना पोळा निमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान बालकांनी लाकडाचे नंदीबैल सजवून आणले होते. 250 बाल स्पर्धकांनी भाग घेतला . परीक्षक श्री प्रल्हाद ठक सर व सागर कोयाळवार सर यांनी सर्व नंदीबैलाचे परीक्षण करून सर्व स्पर्धकांना प्रो्साहन बक्षीस देण्यात आले.

 विशेष प्रोत्साहन बक्षीस 
वरद डोंगरवार  व राज वीर शर्मा या बालक स्पर्धकांना देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सायकल  वेदांशी बुरटकर हिला देण्यात आला.  तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अधिराज डोंगरवार या बालक स्पर्धकाला स्टडी टेबल देण्यात आले. तसेच तृतीय बक्षीस देवांशी तांदूळकर या बालक स्पर्धेकाला स्कूल बग देण्यात आले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी युवक युतीने प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी असिस्टंट गव्हर्नर नितेश जयस्वाल, प्रोजेक्ट  डायरेक्टर रोटेरियन योगेश डोंगरवार ,पवन भुजाडे, अमित नहार ,राम लोया, जोगी सर, हिरालाल बघेले  रोटरी चे  पदाधिकारी अध्यक्ष श्री डॉक्टर सागर वझे व सचिव एडवोकेट मधुकर फुलझेले कोषाध्यक्ष मनोज कोहळे रोटरीचे सदस्य हजर होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय भारती सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. तान्हा पोळा सणा निमित्त परिसरातील छोट्या बालकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या नंदीबैलासोबत स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Comments