पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.नितीन मत्ते यांचा आक्षेप*

पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.
नितीन मत्ते यांचा आक्षेप* 

वरोरा १४/९/२३
चेतन लूतडे वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असून सणाच्या वेळेस सुट्टी दिल्या जाते. या दिवशी शेतकरी  परंपरेने शेतीमधील कामे बंद ठेवून बैलाची सेवा घरी करीत असतो. यासाठी सकाळपासूनच बैलांना मोठ्या प्रमाणात सजवले जाते. बैलांच्या आवडीचे खाद्य सुद्धा देण्यात येते. शेतकरी आपल्या बैल जोडीला सजवून  घरोघरी जाऊन त्यांचे पूजन करून आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण दिवाळी एवढाच महत्त्वाचा असतो.
मात्र या दिवशी सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज असून लहान लहान सणाला सुट्टी दिल्या जाते मात्र शेतकऱ्यांच्या सणाला सुट्टी का  दिली जात नाही.?असा आक्षेप शेतकरी नेते शिवसेना   जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आक्षेप दर्शविला आहे. यासंदर्भात वरिष्ठांना विचारणा केली असता.  वरिष्ठांना हा सण महत्त्वाचा वाटला नाही. 
त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकारी किती महत्त्व देते हे कळते. अशी प्रतिक्रिया मत्ते यांनी नोंदवली.




Comments