मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचा रिफ्लेक्टर बेल्ट

पावसाळा सुरू होताच मोकाट जनावरे वरोरा शहरातील मुख्य रस्त्यांवर येऊन बसत असतात. रात्रीच्या सुमारास ही जनावरे वाहन चालकाला कधी कधी दिसत नाहीत त्यामुळे  अपघात झाले आहे. याची उपाययोजना म्हणून वरोरा येथील सामाजिक संघटना,गांधी उद्यान योग मंडळाने गाईंच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या अनोख्या उपक्रमाला वरोरातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला असून या संघटनेची स्तुती होत आहे.

वरोरा शहरातील ,गांधी उद्यान योग मंडळ रुग्णांकरता रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, मेधावी विद्यार्थ्यांना मदत, गरजूंना वस्त्रांची मदत, गौ-मातेसाठी एक चपाती, व्यापारी मित्र मंडळाची सहल, धार्मिक ठिकाणी भंजन, किर्तन उपक्रम राबित असतात याबरोबरच विविध सांस्कृतिक आयोजन तसेच वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे गठन असे एक ना अनेक कार्य गांधी उद्यान सामाजिक संघटन करीत आहे. 
यातीलच एक उपक्रम म्हणजे भटक्या गाईंच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा उपक्रम होय. नरेंद्र नेमाडे यांच्या नेतृत्वात मनोज कोहळे, नितेश जयस्वाल, जयंत मारोडकर, आनंद गुंडावार, राजू घोडे, प्रवीण सुराणा, शैलेश शुक्ला, शुभम
बदकी, गिरधर नवाल, अजय नरडे, अनिल भडगरे, स्वप्निल देवाळकर ,राजू फलके, सुनील फाळके आणि सर्व सहकारी यांनी हे अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमामुळे गाईंना होणारी दुखापत तसेच नागरिकांचे होणारे अपघात यावर नियंत्रणात आणता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
या रिफ्लेक्टर मध्ये रेडियम ची पट्टी असून वाहन चालकाला ही दुरूनच दिसून येईल. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे जनावरांना सुद्धा कोणतीही दुर्घटना होणार नाही. त्यामुळे अशा मोकाट जनावर दिसल्यानंतर गांधी उद्यान योग मंडळाला सूचना द्यावे अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.

Comments