50 गावातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा.

50 गावातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

मोर्चासाठी तालुक्यातील भाजपा व महिला शिवसैनिक पदाधिकार्याचा सहभाग

वरोरा
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत असून हातात आलेले सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. कृषी विभागाने या संबंधात कोणता रोग आहे हे स्पष्ट जरी केले नसले तरी मोजाक व खोड अळी किंवा पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सगळ्या जातीच्या सोयाबीन पिकावर  झाला असून जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. येणारे सण आणि पुढील हंगाम पाहता, शेतीमध्ये सुकलेले सोयाबीन पाहून  शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.
जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी तहसील कार्यालयाला निवेदन दिले असून या संबंधात पाठपुरावा करीत आहे. आज गुरुवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
यानंतर शेतकरी पुत्र व भाजपाचे पदाधिकारी नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात नंदोरी ते तहसील कार्यालय वरोरा येथे बंडीबैल, ट्रॅक्टर  सायकल व पायदळ  मोर्चा काढण्यात आला. यावेळी 50 गावातील शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी व शेतकरी आपल्या वाहनासोबत या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये तिरंगा झेंडा फडकवत किसान जिंदाबाद चे नारे लावत वरोरा तहसील कार्यालयात निदर्शने दिली. 
यावेळी ट्रॅक्टर मध्ये भरून आणलेले खराब सोयाबीन तहसील कार्यालयाच्या आवारात फेकण्यात आले. शेतकरी आक्रमक असल्यामुळे पोलिसांनी पहिलेच सावध भूमिका घेत तहसील कार्यालयाचे फाटक बंद केले होते. व चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार योगेश कौटकर यांनी निवेदन स्वीकारून शेतकरी व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत या संबंधात चर्चा केली. 
एक रुपयाचा विमा शेतकऱ्यांनी काढला असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे या संबंधात पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणीचे निवेदन सादर करण्यात आले .
जिल्ह्यातील बाकीच्या तालुक्यामध्ये अशाच प्रकारचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर आला असून त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील आणेवारी वर फरक दिसून येणार असून या संबंधात तलाठ्यांना वरिष्ठांनी सूचना केल्या आहे. मात्र विमा पॉलिसीच्या कंपन्या कुठे आहेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला होता. 
हा मोर्चा नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला असून वरोरा शहरातील भाजपाचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, डॉक्टर सागर वझे, युवा नेते शुभम चांभारे, भाजपा पदाधिकारी, तसेच शिवसेना महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे महिला कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांना सोयाबीनचे अनुदान मिळवण्यासाठी या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या. त्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील  या आक्रोश मोर्चाचे पडसाद सरकारवर पडतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया
काँग्रेस व सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी आपले मतप्रदर्शन केले,जे सरकार मध्ये आहेत ज्यांचे केंद्रात व राज्यात सरकार आहे. तेच मोर्चा काढत आहे  याचा अर्थ काय होतो. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, पंतप्रधान भाजपा व शिवसेना पक्षाचेच असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी  आक्रोश मोर्चाची गरज भासते ही खेदाची गोष्ट आहे.


जाहिरात


Comments