चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.*सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.
अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.
सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.
वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असताना अचानक अज्ञात रोगाने सोयाबीन या पिकाला पूर्णता नष्ट केले आहे. मोजाक आणि खोड अळी किंवा पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाकडून या रोगाविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नेते शेतकऱ्याच्या पाठीशी असून यासाठी निवेदन व मोर्चा काढत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी यावेळी एक रुपयात विमा काढला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ देण्यात यावा. किंवा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नसेल त्यासाठी सरकारने सरसकट एकरी चाळीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी नक्की अनुदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment