*लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल, वरोराचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर*नागपूर विभाग शालेय स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात अजिंक्य

*लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूल, वरोराचा मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर*
नागपूर विभाग शालेय स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात अजिंक्य


वर्धा येथे झालेल्या नागपूर विभागीय स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत  17 वर्षाखालील मुलींच्या गटात लोक शिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कुल ने चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करताना नागपूर जिल्ह्याचा 25-18, 25-21 असा सरळ दोन डावात पराभव करीत बोईसर जिल्हा -पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे.
विजयी संघात ईश्वरी राऊत, वैष्णवी गुंतीवार, संचिता हजारे, राशी मांडवकर, श्रावणी ताजने, ईशा बदकी, क्रिष्णा कथडे, समृद्धी पिंगे, नव्या राजूरकर, अनुराधा बोथले, तन्वी उमक, वैष्णवी मिलमीले यांचा समावेश होता.
  मागील वर्षी सुद्धा लोकशिक्षण संस्थेच्या मुलींच्या तिन्ही गटात राज्यस्तरावर प्रवेश प्राप्त करीत प्रविण्य मिळवले होते हे विशेष.
 लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील , उपाध्यक्ष  श्री श्रीकृष्णजी घड्याळपाटील, कार्यवाह श्री विश्वनाथ जोशी, एडवोकेट दुष्यंतजी देशपांडे,  मुख्याध्यापक श्री संजय आंबुलकर, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गजानन जिवतोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, भोजराज चौधरी, संदीप उईके यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
 सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक श्री सुनील बांगडे, अनिल घुबडे, गणेश मुसळे,प्रशिक्षक निखिल बोबडे, संघ व्यवस्थापक वनश्री पालमकुलवार, दुशांत लांडगे व पालक तसेच लोकशिक्षण संस्था वरोडा यांना दिले आहे.

Comments