शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने अपंगांना तीनचाकी सायकलचे वितरण ,चंद्रपूर जिल्हा शिवसेनेचेचा उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांचे नेतृत्व


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वैद्यकीय मदत  कक्षाच्या वतीने अपंगांना तीनचाकी सायकलचे वितरण

 चंद्रपूर जिल्हा शिवसेनेचेचा उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांचे नेतृत्व 


चंद्रपूर जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वरोरा तालुक्यातील कवडापूर (कोठा) येथील अपंग व गरजु व्यक्तींना तिनं चाकी सायकल चे वितरण दि.६ ऑगष्ट रोज (रविवार) ला  हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले.
वरोरा तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायत अंतर्गत कवडापूर (कोठा) येथील मोहन मांदाडे, प्रियंका मोतीराम मेश्राम, शारदा चंदु मेश्राम,या व्यक्ती दोन्ही पायांनी अपंग असल्याची असुन त्यांना चालता देखील येत नसल्याची माहिती गणेश चिडे यांनी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांना दिली, त्या खऱ्या गरजुंना आधार देण्याचा निश्चय जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केला.

२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हा मंत्र घेऊन समाज कार्यात सदा पुढे असलेले जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा तालुक्यातील अनेक गावांत विविध प्रकारचे उपक्रम राबविले त्याचाच एक भाग म्हणून  शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने कवडापूर येथील खऱ्या गरजुंना तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.

यावेळी मुंबई वरुन आलेले वरोरा भद्रावती विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे, युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख अनिल कदम, शिवदुत बंडूजी डाखरे, शिवसेनेचे माजी सरपंच हरीभाऊ वैद्य, सामाजिक माध्यम प्रतिनिधी गणेश चिडे, चंद्रशेखर चौधरी, सरपंच पंकज गायकवाड,चिधुं परचाके, उपविभाग प्रमुख इशांत मांगरुडकर, आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम बजरंगबली चे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नंतर त्या तिन चाकी सायकल चे विधिवत पुजन करून अपंग व्यक्ती मोहन मांदाडे, प्रियंका मोतीराम मेश्राम,शारदा चंदु मेश्राम,यांना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे युवासेना प्रमुख मनिष जेठानी यांनी सन्मानपूर्वक त्या सायकलवर बसवून दिले.
======================
  आनंदाश्रु ना वाट मोकळी करुन दिली.

कवडापूर हे गाव छोटेसे गाव असले तरी त्यामुळे आमच्या कडे अजुनही कुणाचे लक्ष नाही मात्र आज शिवसेनेच्या वतीने आम्हाला ही तिन चाकी सायकल भेट स्वरुपात दिली आता आम्हाला ही चालता येईल असे ते म्हणाले.यावेळी गावातील तरुण शिवसैनिक निलेश पडोळे, गणेश जाभुंळे, सिध्दार्थ सोयाम, आदींची उपस्थिती
======================
गरजूंनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जिल्ह्यात ठिकाणी उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजूंच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असून कुठल्याही आरोग्य विषयक मदतीसाठी शिवसेना जिल्हा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.
जाहिरात

Comments