राजवारसा प्रॉडक्शन च्या वतीने वरोऱ्यात खुली निबंध स्पर्धा * मराठी चित्रपट सुभेदार च्या प्रदर्शनाचे औचित्य साधून आयोजन

*राजवारसा प्रॉडक्शन च्या वतीने वरोऱ्यात खुली निबंध स्पर्धा 
* मराठी चित्रपट सुभेदार च्या प्रदर्शनाचे औचित्य साधून आयोजन

वरोरा : राज वारसा प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट सुभेदार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून २० ऑगस्ट रोजी ही निबंध स्पर्धा होणार आहे.वरोरा येथील नामवंत रियलइस्टेट उद्योजक अनिल वरखडे हे चित्रपट निर्माते आहे . येथील हिरालाल लोया विद्यालयाच्या सभागृहात या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
 वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड युद्ध या विषयावर आयोजित निबंध स्पर्धा २० ऑगस्ट रोजी शिवशंभो बहुउद्देशिय सामाजिक संस्था वरोरा, शंभूराजे मर्दानी खेळ मंच, पुणे आणि विवेकानंद फाऊंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. 

प्रथम क्रमांक - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र,
द्वितीय क्रमांक - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र,
तृतीय क्रमांक - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र आणि
 सुभेदार चित्रपटाचे ४ टिकीट  यांचा समावेश आहे. 
रविवार दि. २०/०८/२०२३ रोजी 
सकाळी 10.00 ते 12.00 
यावेळी ही स्पर्धा होणार आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी जितेश कायरकर यांच्या  ८६०००५७३७२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.................................................

*राजवारसा प्रॉडक्शन निर्मित मराठी चित्रपट*

“*सुभेदार*”
गड आला पण..

*आयोजित - खुली निबंध स्पर्धा*

विषयः वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि सिंहगड युद्ध. 

आयोजक -  शिवशंभो बहुउद्देशिय सामाजिक संस्था वरोरा, शंभूराजे मर्दानी खेळ मंच, पुणे आणि विवेकानंद फाऊंडेशन वरोरा. 

मराठी चित्रपट - *शेर शिवराज, सापळा, केस नं. ९९ आणि  सुभेदार*

पारितोषिके 
*प्रथम क्रमांक* - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र
*द्वितीय क्रमांक* - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र
*तृतीय क्रमांक* - शिवचरित्र ग्रंथ व प्रमाणपत्र
*(स्पर्धेतेली विजेत्यांना सुभेदार चित्रपटाचे ४ टिकीट देण्यात येईल)* 

*स्पर्धेची तारीख- दिनांक २०/०८/२०२३ रविवारला सकाळी १० ते १२* 

*स्पर्धेचे स्थळ - हिरालाल लोया महाविद्यालय, वरोरा,* 
*निबंध स्पर्धेचे नियम*
१) निबंधाच्या सुरूवातीस तुमचे पुर्ण नाव, जन्म दिनांक, वर्ग, तुकडी, शाळा, गाव, पुर्ण पत्ता, मोबाईल नंबर लिहावा.
२) निबंध मराठी भाषेत व विषयाला अनुसरून असावा.
३) निबंधासाठी शब्द मर्यादा २०० शब्दापर्यंत असेल.
४) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही.
५) निबंध स्पर्धा ही सर्वांसाठी खुली आहे.
६) निबंध स्पर्धेसाठी वयाची अट नाही.
७) सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाईल.
८) परिक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल व निकाल हा २५ ऑगष्ट ला मोबाईल क्रमांकावर जाहीर केला जाईल.
९) अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा - जितेश कायरकर ८६०००५७३७२

*टीप - स्पर्धा सुरू व्हायच्या १० मिनिटे पुर्वी पोहचावे*


जाहिरात

Comments