विद्यार्थ्यांनी यशाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी- आमदार प्रतिभा धानोरकर

*विद्यार्थ्यांनी यशाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी- आमदार प्रतिभा धानोरकर* 

वरोरा शहर काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 वरोरा : 
 शालांत परीक्षा या विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पा आहे. या वळणावर विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्न पहावे व त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
 गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना विद्यार्थी यशवंत, किर्तीवंत होताना आपल्या परिवाराचे, आपल्या शाळेचेच नाही, तर आपल्या गावाचाही लोकिक वाढवितात असे आमदार धानोरकर म्हणाल्या.
              वरोरा शहर काँग्रेस कमिटीतर्फे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विलास टिपले,  माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या खामणकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
             वरोरा तालुक्यातील माध्यमिक शालांत परीक्षेतील जयेश गायकवाड, प्रत्युष बुरडकर, प्रांजली गायकवाड,अश्वदीप  ठमके, ऋतुजा पोले ,अभिश्री नलगंटीवार, राशी वैद्य व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील प्राची गहाणे, सृष्टी डुंभरे, प्रथमेश घरत, राणा दास व गौतम बंड या गुणवंतांचा त्यांच्या पालकासह आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले व संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले. कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments