स्टंट बायकर्सवर पोलिसांनी कारवाई करावी :- जनतेची मागणी

स्टंट बायकर्सवर पोलिसांनी कारवाई करावी :- जनतेची मागणी
.     वरोरा :-
           शहरात प्रामुख्याने बस स्टँड रोड तसेच शहरातील मध्यभागीय रोडवर सध्या आजकाल एक नवीनच चलनाला सुरुवात झालेली आहे. काही स्टंटबाज आणि अल्पवयीन मुले दुचाकी गाडीवर बसून स्टंटबाजी, ध्वनी प्रदूषण व जलद गतीने सैराट पणे वाहने चालविताना दिसत आहे. ही मुलं जाणून बुजून दुचाकी वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड करून वाहन चालवीत असताना मोठ्या प्रमाणात आवाज करून ध्वनी प्रदूषण पसरविण्याचे कार्य करीत आहे. तर काही मुलं जाणून-बुजून दुचाकी वाहन दृत गतीने चालवून रोडच्या योग्य दिशेने चालणाऱ्या दुसऱ्या वाहनाला किंवा पायदळ चालणाऱ्या व्यक्तीला व टक्कर मारून त्या निरपराध व्यक्तीला अपघातग्रस्त करीत आहे.
             स्टंट बाईकर्स,ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनावर आणि द्रुत गतीने धावणाऱ्या दुचाकी वाहनावर वरोरा पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शहरवासीय जनता करीत आहे.

Comments