वरोरा तहसीलदारांनी शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणात चुकीचा अहवाल दिला* बाजार समितीच्या आठ संचालकांचा आरोप* जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार

वरोरा तहसीलदारांनी शासकीय तांदूळ तस्करी प्रकरणात चुकीचा अहवाल?

* बाजार समितीच्या आठ संचालकांचा आरोप
* जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार

    वरोरा २९/८/२३
   पत्रकार :- अनिल पाटील 

वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी परराज्यात तस्करी होत असलेला पकडलेला शासकीय तांदूळ हा शासकीय नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी पोलिसांना दिला आहे .पुरवठा अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवशी तो तांदूळ शासकीय असावा असा अहवाल दिला असताना तहसीलदारांनी नंतर दिलेल्या अहवालावरून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना(शिंदे गट) जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह बाजार समितीच्या आठ विद्यमान संचालकांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आज सोमवार दि २८ ऑगस्ट रोजी तक्रारीतून केला आहे. तसेच या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) पोलिसांनी १७ ऑगस्ट२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास परराज्यात निघालेल्या शासकीय तांदळाचे वाहन पकडले. त्यात ३१ टन तांदूळ आढळून आला.  ठानेदारांनी लगेच अन्न व पुरवठा निरीक्षक वरोरा यांना पत्र देऊन या संदर्भात त्यांचा अहवाल मागितला. यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी तो तांदूळ शासकीय असू शकतो असा अहवाल दिला आणि त्यानुसार संबंधित व्यापारी, ट्रक मालक आणि चालक अशा तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल झाला. दरम्यान या प्रकरणात २४ ऑगस्ट २०२३ रोजी वरोरा तहसीलदार यांनी संबंधित तांदूळ हा शासकीय नसल्याचा गोपनीय अहवाल शेगाव पोलीस स्टेशनला दिला आहे. तहसीलदारांनी कुठल्या आधारे व कोणत्या प्रयोगशाळेत तपासून हा अहवाल दिला असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) नितीन मत्ते यांच्यासह कृषी उत्पन्न समितीच्या आठ विद्यमान संचालकांनी केला आहे. पोलिसांनी जो तांदूळ जप्त केला त्याचे माढेळी नव्हे तर तालुक्यातच उत्पादन होत नाही असे असताना तहसीलदारांनी दिलेल्या अहवालावरून त्यांची भूमिका संस्थास्पद असल्याचा आरोप तक्रारकर्त्या संचालकांचा आहे. करिता या प्रकरणात जातीने लक्ष घालून शासकीय तांदळाच्या अवैध विक्री व तस्करी तसेच वाहतुक प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. 
.     शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते 

    कृषी उत्पन्न बाजार समिती, राजेंद्र चिकटे 

याप्रसंगी नितीन मत्ते यांचे सह राजेंद्र चिकटे, पुरुषोत्तम पावडे, जाधव, पांडुरंग झाडे, प्रवीण मालू, निरज गोठी, दिनेश कष्टी इत्यादी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

कारणे दाखवा नोटीस बजावणार 
तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांनी तांदूळ तस्करी प्रकरणात दिलेल्या वेगवेगळ्या अहवालावरून वाद निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार प्राप्त होताच आपण संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावनार व सखोल चौकशी करून प्रकरणातिल सत्य बाहेर काढणार असल्याचे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार कर्त्याना दिले आहे.


आनंदवन चौकाजवळ,गाडगेबाबा नगर येथे प्लॉट विकणे आहे. २०३५ स्क्वेअर फिट
९५७९७३४४२९
९८५०३१२१०६

Comments