वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

*भारतीय जनता पार्टी,वरोरा तर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

*भारतीय जनता पार्टी,वरोरा तर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*...
 
   वरोरा :- 29Aug2023
भारतीय जनता पार्टी,वरोरा  तर्फे दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोज मंगळवार ला हरीश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)चंद्रपूर यांच्या वाढदिवसनीमित्य उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,वरोरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि रुग्णांना भारत सरकार च्या जन -आरोग्य योजना बद्दल, व प्रधानमंत्री विमा योजने बद्दल माहिती देण्यात आली.या नंतर संत.गाडगेबाबा महाराज मठ येथे वृक्षा रोपण कार्यक्रम घेण्यात आले,या कार्यक्रम अंतर्गत मठ परिसरात फळ झाडाचे वृक्ष लावण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी अहेतेशाम अली - माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप,श्री.बाबासाहेब भागडे,- जिल्हा कार्यकरणी सदस्य,सुरेश महाजन - शहर अध्यक्ष भाजप, करण देवतळे - प्रदेश सचिव भा.ज.यु.मो.महाराष्ट्र,आशिष ठाकरे,विनोद लोहकरे,विलास गैनेवार,जगदीश तोटावार,विलास दरापूरकर, डॉ.सागर वझे,संजय राम,अमित चवले,अभय मडावी,शुभम चांभारे,शरद कातोरे,आकाश भागडे,अभिजित गैनेवार,संतोष पवार,ओम यादव,विजय पावडे,राहुल दागमवार,सायरा शेख,सुजाता दुर्गापुरोहित,राजेश साकुरे,संदीप गांधी,खुशाल बावणे,यश काकडे,अमोल लोहकरे, निशिकांत डफ,गंगाधर कारेकार,प्रमोद ढवस,चौधरी कारेकर,तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comments