बलात्कार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष... वरोरा पोलिस स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

बलात्कार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष... 

वरोरा पोलिस स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

चेतन लूतडे वरोरा 

 वरोरा तालुक्यातील पीडित महिला अंदाजे 36 वर्षांची असून तिने ऑक्टोबर 2022 मध्ये आरोपी इरफान शेख विरुद्ध कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.आरोपीस बेल मिळाल्यानंतर बरेच वाद दोघांमध्ये घडत होते.आरोपीची पत्नी ही सुद्धा फिर्यादी महिलेच्या संपर्कात होती. त्यामुळे घरची माहिती तिला व्हाट्सअप वर मिळत असे. या संदर्भातील सगळी माहिती मोबाईल मध्ये सेव करून ठेवली आहे. काही दिवसांनी यानंतर खांबाडा येथे दुकानावर हाणामारी झाली. या मध्ये रिजवान, मोहसीन आणि दानिश शेख यांच्याविरुद्ध कलम 354 अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा  पोलिसात दाखल झाला होता. मात्र आरोपीला अटक होत नव्हती. त्यामुळे आरोपी आणि फिर्यादी महिला यांच्यामध्ये वाद व्हायचे. यासंदर्भात महिला पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी येत असत मात्र नेहमीचीच समस्या असल्याचे सांगून पोलीस टाळाटाळ करीत होते. या संदर्भात आरोपीवर चार व फिर्यादीवर दोन गुन्हे वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. खांबाडा परिसरातल्या इरफान शेख यांचे भाऊ राजवीर शेख यांच्यासोबत  एपीआय निलेश चवरे यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. त्यामुळे बऱ्याच तक्रारी देऊन सुद्धा महिलेला न्याय मिळत नसल्याची तक्रार महिला वरिष्ठांकडे करत होती.

मात्र पीडित महिलेच्या या मागणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करीत असल्याचा समज पीडित महिलेचा होत होता. दहा महिन्याचा कालावधी लोटूनही न्याय मिळत नसल्याची खंत महिलेला होती. तपास अधिकारी चवरे हे आरोपींना पाठीशी घालत गावातील चुकीचे बयाने नोंदणी करून घेत असल्याचा आरोप महिलेने वारंवार पोलिसांकडे व पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला. यामुळे गेल्या दहा महिन्यापासून या महिलेचा रोजगार सुद्धा प्रभावित झाला होता. शेवटी आरोपीच्या त्रासांना व पोलिसाच्या तपासाला कंटाळून शनिवारी वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये सोमवार पर्यंत आरोपीला अटक न झाल्यास विष प्राशन करणार अशी जाहीर धमकी देण्यात आली होती. यामध्ये विष असलेली बॉटल  या महिलेने आणली होती हे विशेष.
यासंदर्भात पोस्ट आणि बातम्या प्रसारी  झाल्या होत्या. यामध्ये पीडित महिलाने पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे विष घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. 
या धमकीकडे पोलिसांनी लक्ष करीत सोमवारी सकाळपासून पीडित महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. रविवारलाच आरोपी रिजवान शेख, मोहसीन शेख, दानिश शेख. यांना अटक दाखवण्यात आली. या घटनेला प्रभावित करणारे पोलीस एपीआय निलेश चावरे यांची तडका फडकी बदली करण्यात आली.
पीडित महिलेकडील व्हाट्सअप 

तरी मात्र पीडित महिलेला समजावण्याचा प्रयत्न उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, प्रभारी रांजणकर ठाणेदार यांच्यासह महिला सेल समजावीत होते. मात्र पीडित महिलेची मागणी आरोपीस सहा महिने अटक झाली पाहिजे. व एपीआय निलेश चवरे यांच्यावर पैसे घेऊन तत्कालीन तपासाला प्रभावित करण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेची होती.

*मात्र अशा गुन्ह्यांमध्ये सात वर्षापेक्षा कमी सजा असल्यास ठोस पुराव्या अभावी आरोपीला अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहे. त्यामुळे फिर्यादी पीडित महिला आणि आरोपी विरुद्ध गुन्हे असले तरी अटक करण्यात आली नव्हती.

या प्रकरणांमध्ये आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे स्वतः तपास करीत असून या महिलेच्या संदर्भात बऱ्याच वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून पीडित महिलेच्या अधिकारी संपर्कात होते. महिला चंद्रपूरला जाणार याची माहिती मिळताच खांबाडावरून पोलिसाचा ससेमीरा पाठीमागे लावला. दहा वाजताच्या सुमारास चंद्रपूर आगाराच्या गाडीमध्ये पीडित महिला चंद्रपूरला जाणार होती. या गाडीला रत्नमाला चौकात थांबल्यावर महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या मुलाला भेटायला जायचे आहे हे कारण सांगत पीडित महिलांनी बस मधून उतरण्यास नकार दिला. 10:45 मिनिटांच्या  दरम्यान ही बस पोलीस स्टेशन वरोरा येथे लावण्यात आली. यानंतर पुन्हा स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांसमोर समजावण्याचे काम सुरू होते. मात्र महिलेने एपीआय निलेश चवरे यांच्यावर कारवाई झाली का हा प्रश्न केला. समोरून उत्तर नाही मिळताच महिलेने 3.45 च्या सुमारास पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये सोबत आणलेले विष प्राशन केले. ही सर्व घटना पोलीस स्टेशन वरोरा यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
                    APl निलेश चवरे 

 तोपर्यंत पोलिसांच्या लक्षात सुद्धा आले नाही. थोड्या वेळात पीडित महिलेची तब्येत बिघडली. 
यानंतर मात्र पोलिसांचे धाबे दणाणले. विष प्राशन केल्याची शंका येत पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करत तपासणी केली. उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे व्यवस्था नसल्याने पीडित महिलेस चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थितीत असून पोलीस प्रशासन आपल्या बंदोबस्तात उपचार करीत आहे.

ही आदिवासी पीडित महिला गेल्या दहा महिन्यापासून न्याय मिळेल अशी अपेक्षा धरून आहे मात्र तिच्या मरण्याने न्याय मिळेल काय? हा यक्ष प्रश्न विभागाकडून उभा राहिला आहे . पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का?
एपीआय चवरे यांचे रिजवान शेख यांच्याशी आर्थिक संबंध होते का?
पोलिसांनी या घटनेत खरंच निष्काळजीपणा केला का.?
असे बरेच प्रश्न या घटनेतून उद्भवले आहे.

आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा

पीडित महिलेस आम्ही समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र महिलेकडून आरोपीस सहा महिन्यासाठी अटक करण्यात यावी, व एपीआय चवरे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. असे मत जाहीर केले होते. त्याप्रमाणे आम्ही चवरे यांना तात्काळ बदली करण्यात आली असून रविवारीच आरोपींना अटक केली आहे. मागणी प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली होती.
महिला सेल तर्फे व पोलीस विभागाकडून पीडित महिलेस समुपदेशन करण्यात आले होते मात्र महिला समजत नव्हती.
आज तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार तिच्यावर कारवाई करण्यात येईल.

जाहिरात 

इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवलं. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरतंय. #Chandrayaan3


 

Comments