खेमजई येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खेमजई येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न  

खेमजाई प्रतिनिधी

ग्रामपंचायत खेमजई, जि. प. उच्य प्राथमिक शाळा खेमजई व कृषी विकास  ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खेमजई येथे गावातून वृक्षदिंडी काढून शाळा परिसरात व गावामध्ये भव्य वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष खेमजई ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रहासजी मोरे, तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण मलकापूर संस्थाचे कार्यक्रम समन्वयक रमेश बादाडे, शेगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अघडते,सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे, ग्रामपंचायत खेमजईचे सचिव मेघश्याम येंचलवार, शाळेचे मुख्याध्यापक बलकी, पोलीस पाटील विश्वनाथ तुराणकर,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेशभाऊ जिवतोडे, शिवसेनेचे वरोरा- भद्रावती संपर्क प्रमुख रितेशजी रहाटे मुंबई , बंडुजी डाखरे, सुधाकरभाऊ मिलमिले, मनिषजी जेठानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
खेमजई गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वा सन किशोर डुकरे यांनी दिले.खेमजई येथे सीताफळ झाडे 1500 तर इतर 100 झाडे लागवड करून ट्रिगार्ड लावण्यात आले. मागील तीन वर्षापासून दर वर्षाला झाडे लावण्याचा व जगवण्याचा उपक्रम लोकसहभागातून खेमजई येथे यशस्वीपणे राबविण्यात येतो. मुकेश जिवतोडे कडून 200 सीताफळ झाडे, किशोर डुकरे कडून 100 सीताफळ झाडे तर ठाणेदार अविनाश मेश्राम कडून 100 सीताफळ झाडे ग्रामपंचायतला भेट देण्यात आले.आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे विध्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक बावने, रविंद्र रणदिवे,  प्रमोद गायकवाड , भगवंत नन्नावरे, भाऊराव दडमल, सीताबाई गजभे, राजू गजभे इत्यादीने सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना रमेश चौधरी, संचालन संजू जांभुळे तर आभार ईश्वर टापरे यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी सर (IPS) यांना वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा तर्फे आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .


Comments