पाऊस आला मोठा, फुल झाला छोटा
पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज
वरोरा
किशोर डुकरे, आसाळा
जिल्हा परिषद मार्फत गाव पांदण रस्ते गावातील नाल्या तसेच अनेक प्रकारचे कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत केल्या जाते मात्र कुठलेच अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते . बांधकामाचे दोष निवारण कालावधी एक वर्ष ते दोन वर्ष पर्यंत सदर ठेकेदार वरिष्ठ अधिकाऱ्याचे संबंध जपून निकृष्ट दर्जाचे बांधकाम लपवल्या जाते. याकडे वैयक्तिक संबंधामुळे अधिकारी सुद्धा कधीकधी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहकत्रास सहन करावा लागत आहे.
याचे उदाहरण म्हणून बोरगाव (दे )ते आसाळा या मार्गावर काही वर्षा अगोदर बांधकाम ठेकेदारा मार्फत करण्यात आले होते. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने बांधलेला पुल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. यामुळे आजूबाजूच्या शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभागच असून शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फुल इतका निकृष्ट दर्जाचा होता की त्यामध्ये टाकलेले भोंगे सुद्धा वाहून गेले तरी मात्र बांधकाम विभागाला अजून पर्यंत जाग आली नाही. याच पद्धतीने रोडची सुद्धा दुरावस्था झालेली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
संबंधित पुलाचे लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे तसेच परिसरातील शेतकरी व इतर नागरिक करीत आहे.
Comments
Post a Comment