शासकीय तांदुळाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास अटक

शासकीय तांदुळाची अवैध वाहतूक करणाऱ्या  वाहनास अटक

वरोरा 18/8/23
किशोर डुकरे , आसाळा

पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या वरोरा चिमूर या महामार्गावर दिनांक 17 ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रक क्रमांकCG 08AC 4500यात शासकीय मालकीचा अवैध तांदूळ अंदाजे किंमत 6लाख 20हजार रुपये, ट्रकची किंमत 25लाख  बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांनी ट्रक चालकासह 31लाखाचा मुद्देमाल  शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हस्तगत केला.
 दिनांक 17 ऑगस्ट रोजी गोवंश तस्करीची कारवाई करत असताना पोलिसांनी नाकाबंदी केली या  नाकाबंदी दरम्यान वरोरा येथून एक ट्रक येताना पोलिसांना दिसला असता ट्रक तपासणीसाठी  थांबून विचारणा केली असता संशयास्पद माहिती ट्रक चालकाने दिल्याने  तांदळाणी भरलेल्या ट्रक शेगाव पोलीस स्टेशन मध्ये तपासणीसाठी लावण्यात आला.
ट्रकचालक माणिकराव रामाजी खोचे कोचे63 रा. कासारवाडी जिल्हा .दुर्ग ,छत्तीसगड हा ट्रक मध्ये शासकीय मालकीचा तांदूळ  नेत असल्याचे निदर्शनात आले पोलिसांनी ट्रक चालक व मालकावर गुन्हा दाखल करून वरोरा पुरवठा निरीक्षक यांच्याकडून प्राथमिक अहवाल प्राप्त करून सदर ट्रकवर कारवाई करण्यात आली.
सदर प्रकरणातील माहिती मिळताच वरोरा येथील पोलिसांनी  माढेळी येथील एका संशयित गोडाऊनला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही कारवाई माननीय पोलिस अधीक्षक परदेशी सर अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू  उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शेगाव  ठाणेदार अविनाश मेश्राम सह हेड कॉन्स्टेबल मेश्राम मदने ,राकेश प्रफुल कांबळे हे करीत आहे.
डॉक्टर सागर वझे यांनी विद्यालयाला दिले लाऊड स्पीकर भेट 


Comments