व्यापाऱ्याला माझ्या कारकिर्दीत गोदाम भाड्याने दिले नाही माजी सभापती राजेंद्र चिकटे

व्यापाऱ्याला माझ्या कारकिर्दीत गोदाम भाड्याने दिले नाही माजी सभापती राजेंद्र चिकटे

गोदाम फक्त अकरा महिन्यासाठी दिल्याचा खूलासा

वरोरा
२८/aug/23
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही दिवसापूर्वी तांदळाचा ट्रक पकडला हा ट्रक कृषी उत्पन्न बाजार समिती माढेळी येथील गोदामातून निघाल्याचे निष्पन्न झाले त्या व्यापाऱ्याला बाजार समितीचे गोदाम माझ्या कारकिर्दीत दिले नाही यापूर्वीपासूनच गोदाम त्या व्यापाऱ्यास किरायानेदिलेआहे माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहे अशी माहिती बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजेंद्र चिकटे यांनी एका निवेदनातून दिली
सध्या तांदळाचा विषय चर्चेत आहे यामध्ये तांदळाची साठवणूक त्या व्यापाऱ्याने किरायाने घेतलेल्या बाजार समिती माढेळी येथील गोदामात मागील काही वर्षापासून करीत आहे त्या व्यापाऱ्याने बाजार समितीचे गोदाम जवळपास नऊ ते दहा वर्षापासून किरायाने घेतले इतके वर्ष माझी कारकीर्द नव्हती माझ्या कारकिर्दी त्या व्यापाऱ्याला गोदाम किरायाने दिल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे यांनी दिली यावरून ते राजकीय आकस पोटी माझ्यावर आरोप करीत असल्याची दिसून येत आहे माझ्या आधी बाजार समिती कोणाची सत्ता होती याची माहिती डॉक्टर देवतळे यांना नसणे याबाबत आश्चर्य वाटते त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले जात असल्याचे दिसून येत आहे सध्या तांदळाच्या प्रकरणात बाजार समितीमधील दोषीवर कारवाई सोडून आरोप करीत निघाले आहे त्यामुळे सध्या बाजार समितीचे कामकाज कसे सुरू आहे हे दिसून येते तांदळाच्या संदर्भात काटापट्टी लिलाव पट्टी आदी दस्तऐवज बाजार समितीचे संचालक राजेंद्र चिकटे नितीन मते पुरुषोत्तम पावडे यांनी बाजार समितीकडे मागणी केली परंतु ती अद्याप देण्यात आली नाही संचालकांना माहिती दिली जात नाही त्यामुळे कामात किती  पारदर्शकता आहे असे दिसून येते असेही निवेदनात बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजेंद्र चिकटे यांनी नमूद केले आहे बाजार समितीचे विद्यमान सभापती डॉक्टर विजय देवतळे मागील वीस वर्षापासून बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहे त्यांना गोदाम केव्हा कोणत्या कारकीर्दीत किरायाने दिले याची माहिती नसणे याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राजू चिकटे.
यासंदर्भात काही पुरावे सादर करण्यात आले आहे.
हे गोडाऊन एप्रिल 2023 पासून मार्च 2024 पर्यंत करण्यात आल्याचे करारात दिसत आहे.
या करार नाम्यावर सचिव यांची सही दिसत आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार सचिव शिंदे यांना माहीत असल्याचा दावा सदस्य राजेंद्र चिकटे यांनी केला आहे.
गोडाऊन 11 महिन्यानंतर कोणाला द्यायचे आहे हे बाजार समितीने ठरवले आहे. त्यावेळी मी सभापती नव्हतो. प्रशासक यांनी हा व्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे बाजार समिती आपले खापर आमच्या माथी फोडण्याचा जो प्रयत्न होत आहे. हे कदापिही सहन करणारे नसून या संबंधात वरिष्ठांना माहिती सादर करून कळवण्यात येईल.


Comments