अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना वनभूमी कसण्यास व वहिवाटीला बाधा निर्माण करणाऱ्या वन विभागाच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा!*

*अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना वनभूमी कसण्यास व वहिवाटीला बाधा निर्माण करणाऱ्या वन विभागाच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा!* 

 *शिवसेना जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे मागणी* 

चंद्रपुर:- येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) सुधारणा नियम, 2012 मधील नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वन विभागाने दावेदारच्या भोगवट्यातील वनभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही न करण्याचे क्रमांक/मह.सहा./वहका-पेसा-राखीव वन/कावि/2023/270 दिनांक 12/05/2023 च्या आपल्या पत्राला वन विभागाकडून केराची टोपली दाखवून पोलिस प्रशासनाला हाताशी घेवून चोरगांव व वरवट येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींना धमकावुन/बळजबरी करुन वनभूमी कसण्यास अड़थळा आणि वहिवाटीला बाधा आणून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी व जीवन जगणे असहाय्य झाल्यामुळे आपण तात्काळ दखल घेवून दोषी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यवाही

Comments