डॉक्टर सागर वझे यांचा स्तुत्य उपक्रम
वरोरा
2 ऑगस्ट2023
वरोरा तालुक्यातील धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे नित्य उपयोगात येणाऱ्या ध्वनिशेपकाची(लाऊड स्पीकर) गरज लक्षात घेता भाजप युवा नेते आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांनी वरोरा तालुक्यातील मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांना ध्वनीशेपक भेट देण्याचा संकल्प केला आहे. नुकतेच सरदार पटेल वार्डातील हनुमान मंदिराला त्यांनी एक ध्वनी संच भेट दिला.
वरोरा शहरासह तालुक्यातील मंदिरांमध्ये नित्यनियमाने पूजा अर्चना होत असते. त्या ठिकाणी ध्वनि क्षेपकाची व्यवस्था नसल्यामुळे मंदिरांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच यामध्ये प्रार्थनेच्या वेळी आणि कार्यक्रमाकरिता हीच अडचण येत असल्याचे लक्षात येताच डॉक्टर सागर वझे यांनी पहिल्या टप्प्यात 15 मंदिरांना आणि निमशासकीय शाळांना ध्वनिक्षेपक देण्याचा संकल्प केला आहे. नुकतेच त्यांनी मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन करून स्तनाच्या कॅन्सर च्या गरजू रुग्णांना मोफत उपचार दिले होते हे विशेष.
नुकत्याच सरदार पटेल वार्डात हनुमान मंदिराला भेट दिलेल्या कार्यक्रमात रवी शिंदे, शरद यादव, किरण कामडी, सौरभ लोहकरे, उज्वल लोहकरे, सुधाकर कुंकुले बजरंग यादव आदी उपस्थित होते.
जाहिरात
Comments
Post a Comment