किशोर भाऊ टोंगे यांच्या कडून पत्रकारांना दहा लाखाच्या विमा कवच पॉलिसीचे वाटप.77 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम

किशोर भाऊ टोंगे  यांच्या कडून पत्रकारांना दहा लाखाच्या विमा कवच पॉलिसीचे वाटप.

77 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राबविला उपक्रम

चेतन लूतडे 
वरोरा 

 वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा टोंगे यांनी वरोरा तालुक्यातील  पत्रकारांना दहा लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वाटप केले.  आज मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला. समाजाचा आरसा असलेला पत्रकार आज समाजाकडून दुर्लक्षित झालेला आहे. तेव्हा किशोर दादा टोंगे यांनी दखल घेऊन राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पत्रकार संघटने कडून कौतुक होत आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त पत्रकार बांधवांना एक वर्षासाठी दहा लाखाचे विमा कवच प्रदान केल्याने पत्रकारांनी अभिनंदन केले आहे. समाजातील पत्रकारांच्या भावना जाणून घेत. शासनापासून उपेक्षीत असलेला पत्रकारांच्या कुटुंबासाठी या पद्धतीचा उपक्रम राबवून  राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाचा बदल दाखवून दिला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विकासात्मक बदल दिसेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
किशोर भाऊ टोंगे येणार्या विधानसभेचे  उमेदवार असणार असून  गरजवंतांचे हात मजबूत करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर ऑटो संघटना, नगरपालिकेतील सफाई कामगार यांनासुद्धा विमा कवच प्रधान करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या ठिकाणी अपास ग्रुपचे अध्यक्ष विशाल मोरे यांच्या संघटनेला येत्या नागपंचमीला सर्पमित्रांसाठी दहा लाख रुपयाचा विमा कवच सुद्धा देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर केल्याने सर्व मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या अनोख्या उपक्रमासाठी पत्रकार त्यांच्या पाठीशी असून गरजवंतांचे वारकरी ठरणारे किशोर भाऊ टोंगे यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत वरोरातील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

किशोर भाऊ टोंगे मित्र परिवारातर्फे आनंद चौक येथील कार्यालयात दहा लाख विमा  पॉलिसीचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर भाऊ टोंगे, प्रमुख अतिथी पुण्यनगरीचे अनिल पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक तरुण भारतचे शाम ठेंगडी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभम आमने यांनी केले. यावेळी वरोरा तालुक्यातील  सर्व पत्रकारांनी हजेरी लावली होती.


जाहिरात

Comments