कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

शिवसेना (उबाठा) तर्फे खेमजई ग्राम वासियांना 200 वृक्ष भेट, मदतीचा सप्ताह उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांचे नेतृत्व

शिवसेना (उबाठा) तर्फे खेमजई ग्राम वासियांना 200 वृक्ष भेट 

मदतीचा सप्ताह उपक्रम : जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांचे नेतृत्व

वरोरा : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात "मदतीचा सप्ताह" उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. ५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खेमजई येथे 200 वृक्ष भेट देण्यात आले. 

शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात "मदतीचा सप्ताह" या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील खेमजई ग्रामवसियांतर्फे दरवर्षी वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला जातो. यावर्षीसुद्धा 10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प  राबविण्यात येत आहे. यात आणखी भर घालत जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेत भाग घेत. 200 सिताफळ वृक्ष ग्रामवासीयांना भेट देण्यात आली . गावातील मुख्य ठिकाणी वृक्ष लागवड करून  उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. खेमजई ग्राम वासियांतर्फे वृक्षलागवडीच्या संकल्पनात निधीची कमतरता भासल्यास शिवसेना ग्रामवसियांच्या पाठीची ठाम उभी राहील असे आश्वासन जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी शिवसेना (उबाठा) वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख रितेश रहाटे, शेगांव (बु ) पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम , पशुवैद्यकीय अधिकारी अघडते युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवदूत बंडु डाखरे, विधानसभा मिडीया प्रमुख गणेश चिडे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रदास मोरे , सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी , पोलीस पाटील विश्वनाथ तुराणकर तसेच ग्रामवासी उपस्थित होते.

Comments