चंद्रपूर येथील युवका जवळून दहा किलो गांजा जप्त.आरोपींचा शोध सुरू

चंद्रपूर येथील युवका जवळून दहा किलो गांजा जप्त.
आरोपींचा शोध सुरू

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 

पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. १४/०७/२३ रोजी गोपनीय माहीतीच्या आधारे, एक इसम  आपले निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन जात असल्याची माहिती मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप, पोलीस स्टेशन माजरी येथील पोलीस स्टॉप, स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील पोलीस पथक यांनी वरोरा येथील विश्रामगृह जवळ  सापळा रचुन आरोपी रमेश शंकर नरवडे वय ४१ वर्ष रा. बगळ खिडकी नाग मंदीर जवळ चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याच्या  जवळ असलेल्या निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगची झडती घेतली असता त्यात खाकी रंगाचे प्लास्टीक टेप पट्टीमध्ये गुंडाळलेल एकुन ०५ नग बंडल ज्यात एकुन १०.२६४ किलो ग्रॅम गांजा कि. १,०२,६४० रू. चा अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदरचा गांजा जप्त करून आरोपी विरूध्द एन. डी. पि.एस. कायदा कलम ८(क), २०(ब),II(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
 सदर आरोपीचे पोलीस कोठडी रिमांड घेवुन पुढील आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.
हा गांज्या कोणत्या व्यक्तीला विकण्यासाठी आणला होता. या व्यक्तीने कुठून विकत घेतला होता. आजपर्यंत कोणत्या व्यक्तीसोबत याचे संबंध होते. मोबाईल वरून कोणाला संपर्क साधला असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून वरोरा पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.

सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. सहा पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात परि. पो. उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी योगेश रांजणकर पो. स्टे. वरोरा, सपोनि निलेश चवरे, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि किशोर मित्तरवार, नापोशि किशोर बोढे, पोअं. दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, फुलचंद लोधी तसेच पो.स्टे. माजरी येथील सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि भोजराम लांजेवार, नापोशि अनील बैठा व स्थागुशा येथील पोनि महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे यांचे पथकांनी पार पाडली.

रोटरी क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सागर वझे यांचे स्वागत करताना आ.प्रतिभाताई धानोरकर

शुभम चांभारे यांचा बीजेपी प्रवेश

Comments