वरोरा
चेतन लूतडे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वरोरा शाखेतर्फे शुक्रवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी वरोरा शहरातील मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगर मंत्री मोनिका टिपले यांच्या नेतृत्वात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले.
अभाविप ला ७५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्याने १० व १२ चा गुणवंत विद्यार्थी सत्कार घेण्यात आला व २०२३-२४ ची अभाविप नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यात मोनिका टिपले हिला नगर मंत्री तर कुणाल आसुटकर , आशिष भट्ट , सौरभ साखरकर यांना नगर सहमंत्री पदभार देण्यात आले.
दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सिनेट सदस्य , प्रमुख अतिथी डॉक्टर सागर वझे, माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली, आर्या पाचखेडे, शैलेश दिडावार , अमित पटेल,करण देवताळे, शुभम चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment