प्रभारी वरोरा ठाणेदार यांचा अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला जबरदस्त दणका.
रांजणकर यांच्या नियुक्तने अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळींचे धाबे दणाणले.
चेतन लूतडे वरोरा
18जूलै23
वरोरा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यानंतर वरोरा ठाणेदार म्हणून नुकतेच प्रभारी योगेश रांजणकर यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे. गुटखा व्यवसाय, अवैध दारू व्यवसाय, रेती तस्करी, कोळसा तस्करी, चोरी प्रकरणे अशा अनेक गुन्हे ते निकालीस काढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आवाज बनले असून वरोरा करांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दी 17/07/23 रात्री अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली आहे.सदर कारवाई खांबाड्या जवळ करण्यात आलेली आहे. चार चाकी मालवाहू गाडीमध्ये 40 पेट्या एकूण नग 400अवैध दारू जप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण मुद्देमाल किंमत ₹6 लाख रुपये जप्त केले आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे
1. अमोल चौधरी
2. पवन भोयर
3. हर्षल खंगार यांवर मदका अंतर्गत कलम 83 व 65(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुढील कारवाई वरोरा पोलीस करीत असून ही दारू कुठून आणली आणि कोणत्या मालकाकडे घेऊन जात होते. दारूवर कोणाचे बॅच नंबर आहे. याचाही शोध घेणे सुरू आहे.
अशाच पद्धतीची अवैध दारू अनेक खेड्या गावांमध्ये पोहोचत असून एक्साईज अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सदर कार्यवाही मा श्री.रवींद्रसिंग परदेशी सर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ,मा. रीना जनबंधू मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर , मा.श्री आयुष नोपाणी सर ASP वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली परि पो उप अधीक्षक योगेश रांजणकर API चावरे, PSI बेलसरे ,PSI किशोर मित्तरवार PSI मुसळे , NPC किशोर बोडे, PC सुरज मेश्राम PC दिनेश मेश्राम PC फुलचंद लोधी व इतर पोलीस स्टाफ यांनी केली.
Comments
Post a Comment