घोडाझरी तलावात शेगाव येथील चार युवक बुडाले

घोडाझरी तलावात शेगाव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले.

चेतन लूतडे
वरोरा 

वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मित्रांनी रविवारी सकाळी घोडाझरी जाण्यासाठी बेत आखला होता. त्याप्रमाणे मित्राची स्कार्पिओ गाडी करून सकाळी आठ मित्रांसोबत घोडाझरीला रवाना झाले. यामध्ये जातानी काही मित्रांनी वे टू झरी अशी स्टेटस टाकत रविवारची सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. यादरम्यान सकाळी मित्रांना भेटून आज संध्याकाळी वापस येणार असल्याचे सांगत होते. 
मात्र काही मित्रांसाठी हा काळ दुर्दैवी ठरला. घटनास्थळी मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असताना सेल्फी काढण्याच्या नादात एकाचा पाय घसरला. त्यामुळे लगेच मित्रांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र मित्र जास्तच खोलात जात होता आणि त्यामागून तीन मित्र सुद्धा. बाकीचे मित्र पाहण्याशिवाय काहीच करू शकले नाही.
काल रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसामुळे घोडाझरी तलावाच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून या मुलांना याचा अंदाज आला नाही. आणि चारही मित्र 1)मनीष श्रीरामे (२६) धीरज झाडें (२७) संकेत मोडक (२५)
चेतन मांदाडे ( १७ ) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. 
ही वार्ता पसरतात शेगाव परिसरातील मित्रांमध्ये व आप्त परिवारात शोककळा पसरली असून नागभिड पोलीस बुडालेल्या युवकांच्या शोध घेत आहे.



मनीष श्रीरामे (२६)
धीरज झाडें (२७)
संकेत मोडक (२५)
चेतन मांदाडे ( १७ )
,...............,

जाहिरात

Comments