अखेर “ त्या ” व्यावसायिकाचे पैसे खात्यात परत आले
वरोरा पोलीसाची सतर्कता
कलकत्ता येथील आयडीबीआय बँकेचे खात्यात जमा झाली होती रक्कम
चंद्रपुर
वरोरा शहरातील एका व्यावसायिकाला एका भामट्याने २० हजार रुपयाने गंडविले होते . दुकानदारांनी तात्काळ सिसिटीव्ही पुटेज घेऊन वरोरा पोलीसात तक्रार दाखल केली. तक्रारीची तात्काळ दखल घेत वरोरा पोलीसांच्या सतर्कतेने अखेर १० दिवसांनंतर त्या व्यावसायिकांच्या खात्यात पैसे जमा झाले .मात्र तो भामटा फरार असुन वरोरा पोलीस त्याचा शोध घेत आहे.
प्राप्त माहितीनुसार वरोरा शहरातील आंबेडकर चौकात आर के मोबाईल नावाचे दुकान आहे . या दुकानात दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एक युवक आला त्याने दुकानदारास अर्जंट दुसर्याच्या खात्यात पैसे पाठवायचे आहे . तुमचा जो चार्ज होईल तो देऊ असे म्हणत मोबाईल मध्ये बारकोड दाखवून २० हजाराची रक्कम दुकानदार कडून पाठवून घेतली . २० हजारच्या रक्कमेवर २०० रुपये चार्ज नगदी दिला . आणि २० हजार रुपये चुकीने मोफेड दुचाकीच्या डिक्कित राहिले आहे . तो दुकानाच्या बाहेर गेला आणि दुकानासमोर ठेवलेल्या मोफेड दुचाकी वर बसला आणि पसार झाला . तात्काळ दुकानदाराच्या लक्षात आले की आपली फसगत झाली म्हणून दुकानदाराने त्या भामट्याचा मागे गेला मात्र तो सुसाट पणे पळून गेला . यानंतर दुकानदाराने तात्काळ सिसिटीव्ही पुटेज काढून वरोरा पोलिस स्टेशन गाठले व त्या अज्ञात भामट्या विरुद्ध तक्रार दाखल केली . तक्रार दाखल होताच दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरोरा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात वरोरा येथे नव्यानेच आलेले प्रभारी ठाणेदार उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश रांजणकर , गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांनी स्वत: तपास हातात घेत सदर बँक अधिकार्याशी चर्चा करून त्या भामट्याच्या खात्याचा शोध घेत त्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम होल्ड केली आणि अवघ्या १० दिवसांत त्या व्यावसायिकाच्या खात्यात रक्कम जमा झाली . रक्कम जमा होताच व्यवसायिकाच्या चेहर्यावर हसू फुलले .
त्या भामट्याचे खाते कलकत्ता बँकेत
२० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची वरोरा पोलिसात तक्रार दाखल झाली . बारकोड वर पैसे पाठविल्याने त्याचा मोबाइल नंबर व खाते क्रमांक आला नाही . मात्र वरोरा पोलिसांनी बँक अधिकार्याशी चर्चा करून कोणत्या बँकेत पैसे गेले याचा शोध लावला . त्यानंतर पोलिसांना सदर खाते हे कलकत्ता येथील आयडीबीआय बँक चे असल्याचे लक्षात आले . पोलीस अधिकार्यानी सदर बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याशी पत्र व्यवहार करून त्या भामट्याच्या खात्यातील रक्कम होल्ड केली . या आठ दिवसाच्या प्रक्रियेनंतर दिनांक २२ जुलै रोजी मोबाईल व्यवसायिकाच्या खात्यात अखेर रक्कम जमा झाली .वरोरा पोलिसांच्या कामगिरीने फसवणूक करणाऱ्या भामट्याना वचक बसला आहे.
जाहिरात
Comments
Post a Comment