वरोरा
चेतन लूतडे
मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात वरोरा येथील आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गजानन मेश्राम यांच्या सोबत शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते. मणिपूर मध्ये झालेल्या घटनेनंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी बांधव जन आक्रोश मोर्चा करीत असून मणिपूर सरकार व केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आहे. वरोरा येथील आदिवासी समाजाने या घटनेविषयी राष्ट्रपतीला निवेदन सादर केले असून या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
यावेळी तहसील कार्यालयात शेकडो आदिवासी बांधवांनी उपविभागीय कार्यालयात आपले निवेदन सादर केले. व केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मणिपूर मधील कांगपोकपी जिल्ह्यात चार मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची दिंड काढण्याचा अमानुष प्रकार घडला होता. या प्रकरणात सहभागी असलेल्या 14 आरोपींची पोलिसांनी ओळख पाठवली आहे. या प्रकरणात सहा आरोपींची तुरुंगात रवांगी सुद्धा करण्यात आली आहे. याच प्रकरणातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक महिला भारतीय लष्करातील माजी जवानाची पत्नी आहे. यासंदर्भात 21 जून रोजी सैकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
जाहिरात
Comments
Post a Comment