वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावर अंत्ययात्रे धर्मादरम्यान खांदकरी घसरून जखमी

वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावर अंत्ययात्रे धर्मादरम्यान खांदकरी घसरून जखमी

* शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून खेद
* रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची शिवसेनेची
 मागणी *
आंदोलनाचा दिला इशारा 

वरोरा : चिमूर ते वरोरा या नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अनेक प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले आहे. एवढेच नव्हे तर शेगांव परिसरात अंत्यविधी दरम्यान खांदकरी मृतदेहासह घसरून पडल्याने जखमी झाले असल्याची दुर्दैवी आणि संताप जनक घटना घटना घडली आहे. यामुळे सदर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करून द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी एसआरके कंपनीकडे निवेदनातून केली आहे यावर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
 वरोरा ते चिमूर या राज्य महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. या राष्ट्रीय महामार्गाच्या चार पदरी सिमेंटीकरनाचे काम चार वर्षापासून सुरू आहे. अतिशय संत गतीने सुरू असलेल्या सदर कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर काही भागात चिखलाचे साम्राज्य असल्याने गाड्या घसरून अपघात होत आहे. चार वर्षात अनेक लहान- मोठ्या अपघातात कितीतरी लोकांनी जीव गमावलेले आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व सुद्धा आलेले आहे. शेगाव (बु) परिसरात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. यामुळे वाहने घसरून अपघात होत आहे. एवढेच नव्हे तर अंत्यविधी दरम्यान खांदकरी घसरून मृतदेहासह खाली पडल्याने जखमी होण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत घडत आहे. हे अतिशय संताप जनक आहे. या सर्व बाबींची नोंद घेवून सदर मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. तसेच शेगाव परिसरातिल स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता येत्या पंधरा दिवस दिवसात पूर्ण करून द्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी एसआरके कंपनीचे व्यवस्थापक युगंधर रेड्डी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे. निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, उपतालुका प्रमुख राजू राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख ओमकार लोडे, शेगाव च्या उपसरपंच साधना मानकर, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण ठेंगणे, विभाग प्रमुख प्रफुल वाढई, सागर पिंपळशेंडे, चिरंजीवी रावी, अभिषेक रायपूरकर, राकेश इखार, शिशुपाल हिवरकर, रवी वाटकर, अनिकेत हिवरे उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि उपविभागीय अधिकारी वरोरा यांना देखील पाठविण्यात आल्या आहे.

Comments