गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

डॉ. वझे यांचे विविध समस्या बाबत वरोरा न.प. सि.ओ. ना निवेदन

डॉ. वझे  यांचे विविध समस्या बाबत वरोरा न.प. सि.ओ. ना निवेदन 

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा शहरातील नगरपालिकेचा कारभार  दुर्लक्षित असून  या संबंधित  भाजपा कार्यकर्त्यांनी थेट नगरपालिकेच्या सिओ . ना निवेदन सादर करत तात्काळ तक्रारीचे निवारण करण्यासाठी सांगीतले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

 पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून याकडे लक्ष देण्यासाठी नगरपालिकेतर्फे दरवर्षी मोहीम राबवली जाते मात्र यावर्षी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्याने शहरांमध्ये या समस्या कडे लक्ष देण्यासाठी  कोनीच ऊरला नाही .

त्यामुळे भाजपाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांनी मुख्याधिकारी नगरपालिका वरोरा यांना रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत व शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंबंधी निवेदन सादर केले आहे. या मोकाट जनावरांना जिओ टॅगींग करून त्यांच्या मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसामुळे रोड मध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात पडले असून त्यांच्या बाजूला जनावरे बसून असतात त्यामुळे जाणार्या येणाऱ्यांसाठी अडथळा निर्माण झाला आहे. या संबंधातील बरीच रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने या समस्येकडे तात्काळ लक्ष देत समस्या निकालास काढावी . असे निवेदन मुख्याधिकारी गजानन भोयर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड, रमेश राजूरकर, सुरेश महाजन, माजी नगराध्यक्ष अली, अमित चवले, राहुल बांदुरकर, संजय राम, अभिजीत गैणेवार, राहुल डागमवार, खुशाल बावणे, कादर शेख आधी भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Comments