शहरात गांजा सप्लाय करणाऱ्या टोळीवर पोलिसांची धडक कारवाई. चंद्रपूर येथील युवक अटकेत

शहरात गांजा सप्लाय करणाऱ्या टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपूर येथील युवक अटकेत

वरोरा 14/7/23
चेतन लूतडे

वरोरा शहराच्या मध्यभागी सुमारे अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान काही संशयित युवकांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले आहे.
हे सर्व युवक चंद्रपूर येथील असल्याचे कळत आहे. या युवकांकडून नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
सध्या या युवकांची चौकशी विश्रामगृह जवळ सुरू असून यांच्याजवळ  मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला असून वरोरा शहरात तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसां जवळ होती. याच माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी विश्रामगृह रोडवर निर्जन स्थळी या युवकांना ताब्यात घेतले आहे.
सध्या या रोडवर  जाण्यासाठी बंदी घातली असून घटनास्थळी पंचनामा पोलीस करीत आहे.

यांची पुढील तपासणी वरोरा प्रभारी ठाणेदार रांजणकर यांच्या नेतृत्वात करीत आहे.

Comments