रोटरी ही माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारी प्रयोगशाळा-गणी मेमोन

गरजवंतांची मदत हाच खरा आनंद -गणी मेमोन 

वरोरा रोटरी क्लब अध्यक्ष म्हणून डॉक्टर सागर वझे  यांची नियुक्ती

वरोरा : स्वतःसाठी तर सर्वच जगतात परंतु दुसऱ्यासाठी ही जगता आले पाहिजे. समाजातिल दुःखी व गरजवंतांची मदत केली पाहिजे. कुणाच्या आनंदात सहभागी होता नाही आले तरी चालेल परंतु त्यांच्या दुःखात नक्कीच सहभागी झाले पाहिजे. तुमच्या मदतीमुळे अशा दुःखी व गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच तुमच्यातील खरी माणुसकी दाखवून देतो. रोटरीचे कार्य असेच आहे. रोटरी ही खऱ्या अर्थाने माणसात माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारी प्रयोगशाळा आहे. आणि याचा प्रत्यय नवीन सभासदांना नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन रोटरी चे जळगाव येथील असिस्टंट डीजी गणी मेमोन यांनी रोटरी क्लब वरोराच्या दि ८ जून रोजी झालेल्या पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
स्थानिक कटारिया मंगल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, असिस्टंट डीजी नितेश उर्फ दादा जयस्वाल, रोटरी क्लब वरोरा अध्यक्ष डॉ. सागर वझे, सचिव ॲड मधुकर फुलझेले, कोषाध्यक्ष मनोज कोहळे, इनरव्हील क्लर्कच्या अध्यक्षा वैशाली चहारे, सचिव प्रतिभा मणियार,रोटरीचे मावळते अध्यक्ष पराग पत्तीवार, मावळते सचिव अदनान सिद्धीकोट प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पराग पत्तीवार यांनी मागील वर्षीचा अहवाल सादर केला.  यानंतर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब वरोराच्या कामाचे कौतुक केले. सर्वधर्म समभाव सांभाळताना कोरोना काळात रोटरीने दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. तसेच दिवंगत खासदार बाळू धानोरकर आपल्यात नसले तरी समाजकार्यासाठी रोटरी ला त्यांच्याकडून होत असलेली शक्य ती मदत पुढे आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. डॉ. सागर वझे यांनी पदभार सांभाळल्यानंतर जास्तीत जास्त आणि चांगले समाजाभिमुख प्रकल्प राबवीण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच महिलांमधील स्तनाच्या कॅन्सरचे निदान व उपचार याकरिता यावर्षी आयोजित मॅमोग्राफी शिबिर यापुढे प्रत्येक वर्षी आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या नवीन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून बंडू देऊळकर यांची नियुक्ती करण्यात आली. 
तर इतर पदाधिकारी व संचालक मंडळामध्ये योगेश डोंगरवार, विनोद नंदुरकर, राम लोया,  अमित लाहोटी, नितेश जयस्वाल, रवी शिंदे, डॉक्टर विवेक तेला, राहुल पावडे ,अभिजीत बोथले, ॲड विजय पावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. याप्रसंगी देवानंद गावंडे, डॉ. राहुल शेंद्रे, डॉ. विक्रांत भेंडे, परीक्षित एकरे, किशोर डोमकावळे, समीर हक्के, शुभम चिमूरकर, अनंता सायरे या नवीन सभासदांना रोटरी मध्ये प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन होजप्पा अली यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ॲड मधुकर फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर बारई, दामोदर भाजपाले, विशाल जाजू ,आकाश गहूकर, प्रितेश जैन, पुनम जयस्वाल कार्यभार सांभाळला.

Comments