महिलांच्या स्तनांचा कर्करोग तपासणी व निदान शिबिराचे उद्घाटन,* राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन,*वझे कुटुंबीयांची आरोग्यदायी परंपरा अशीच कायम राहो. शोभाताई फडणवीस

महिलांच्या स्तनांचा कर्करोग तपासणी व निदान शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन

वझे कुटुंबीयांची आरोग्यदायी परंपरा अशीच कायम राहो. शोभाताई फडणवीस

वरोरा
चेतन लूतडे

स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ सुयोग हॉस्पिटल वरोरा, भारतीय जनता पार्टी, व रोटरी क्लब, वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅमोग्राफी टेस्ट मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन १जूलै ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुरुवात करण्यात आली.
दत्ता मेघे हॉस्पिटल येथील डॉक्टरांचे स्वागत करताना डॉक्टर मीरा वझे, वरोरा 

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर
ग्रामीण जनतेमध्ये मुख रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतात त्यामुळे अशा पद्धतीचे कॅम्प पक्षातर्फे घेण्याची योजना आम्ही आखत आहोत. दत्ता मेघे यांचे विदर्भात आरोग्य संबंधित सर्वात मोठे कार्य आहे. त्यांचा योग्य समज घेऊन डॉक्टर वाझे यांनी हा कॅम्प घेऊन गरीब लोकांचा वेळ, पैसा त्यांनी वाचवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी छोट्या छोट्या बाबींवर काम करणे सुरू केले होते. स्वच्छतेच्या बाबतीत स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश सर्वांना दिला. त्यामुळे कॉलरा मलेरिया सारख्या साथीच्या रोगाचे प्रमाण कमी करण्यात यश आले. 
आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांनी नवीन योजना राबवून आमूलाग्र बदल केला आहे. 2014 साली सहा एम्स होते. यानंतर 15 एम्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सुरू झाले.
औषधी निर्मितीपासून विदेशात औषधी पुरवठा करण्यापर्यंतचे कार्य या सरकारने केले आहे. 
डॉक्टर सागर वझे यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत पक्षातील कार्यकर्त्यांना जनतेसाठी  कार्य करत राहण्याचा संदेश दिला.

    माजी आमदार शोभाताई फडणवीस
आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
     डॉक्टर सागर विनायक वझे
आज डॉक्टर्स दिवस  भारतरत्न डॉक्टर बीसी रॉय यांच्या जन्मतिथी निमित्त डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून 1 जुलै 2023 ते 5 जुलै 2023 पर्यंत स्त्रियांमधील स्थानाचा कॅन्सर तपासणी व निदान करण्यात येत आहे. यालाच मॅमोग्राफी म्हटलं जातं मॅमोग्राफी ही एक एक्स-रे तपासणी आहे. विशिष्ट पद्धतीच्या तपासणी मधून स्त्रियांच्या स्तनांमधील गाठीची तपासणी कॅन्सर आहे की नाही हे बघण्यासाठी केला जातो. डॉक्टर्स डे च्या निमित्त आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. भारतीय जनता पार्टी व रोटरी क्लब वरोरा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे स्वागत करताना डॉक्टर विवेक तेला

या कार्यक्रमासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर खूजे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार शोभाताई फडणवीस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, रेखाताई पाटील, सागर वझे व त्यांच्या मातोश्री व त्यांच्या पत्नी मीरा वझे, डॉक्टर विवेक तेला,करण देवताळे, रमेश राजूरकर, राजू गायकवाड,एहेतेशाम अली, समीर बारई , ओम मांडवकर,रोटरीचे अध्यक्ष पराग पत्तीवार, अदनान सिद्दीकोट, बाळूभाऊ पिसाळ,बंडू देऊळकर, राजूभाऊ जाजूर्ले, डॉक्टर राहुल धांडे, डॉक्टर कपिल टोंगे, भाजपाचे भगवान गायकवाड, आदी  मान्यवर व्यक्ती व भाजपाचे व रोटरी क्लबचे सदस्य  या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
करण देवताळे यांचे स्वागत करताना रोटरीचे सदस्य जितेंद्र मत्ते

भाजपा तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड यांचे स्वागत करताना समीर बारई

माझी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांचे स्वागत करताना बाळूभाऊ पिसाळ

सुरेश महाजन यांचे स्वागत करताना डॉक्टर कपिल टोंगे


दत्ता मेघे येथील डॉक्टर यांचे स्वागत करताना प्रतिभा मणियार
राजूभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवस साजरा करताना राष्ट्रीय ओबीसीआयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर.


Comments