शेतकऱ्यांना मिळणार वनहक्क जमिनीच्या अधिकार.! *विलासराव नेरकर*

 शेतकऱ्यांना मिळणार वनहक्क जमिनीच्या अधिकार.! *विलासराव  नेरकर*         
वरोरा 
                 मौजा वनलीग्राम, पडसोडा व रानतडोधी (शी) येथील वनहक्क द्वारे जमीनिच्या 7/12उतारा संबंधीत तलाठी यांचे कडून मिळण्याच्या आदेश होण्याबाबत गट क्रमांक 13 क्षेत्र 26.38 हेक्टर आर जमीन वनहक्क समिती द्वारे मिळालेली आहे,परंतु आज पावोतो खातेदारांच्या नावे सदर मिळालेल्या शेत जमिनीच्या 7/12 तयार झालेला नाही तरी शासन परिपत्रका क्रमांक एस 10/2011/प्र क्र 175/एफ 3 दिनांक 2 जानेवारी 2012 नुसार सदर खातेदाराच्या नावाने 7/12 मिळण्याकरिता आदेश मिळण्यात यावा सदर पुनर्वसित गावांना वनविभागाच्या जमिनीचे वर्ग-1 या मध्ये रूपांतर करून खातेदाराच्या नावे 7/12 वर नोंद घेण्यात यावी जेणेकरून शासनाच्या विविध योजना च्या लाभ शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे   आणि पीक कर्ज सुध्दा बँकेच्या मार्फत देण्यात यावे या बाबतीचे निवेदन मा.तहसीलदार साहेब यांना देऊन  यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावर मा.तहसीलदार साहेब यांनी या विषयावर सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देवू असे आश्वासन दिले 

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव नेरकर, चंद्रकांत कुंभारे,शहर उपाध्यक्ष, प्रवीण वासेकर,ओबीसी तालुका अध्यक्ष, निखिल विरुटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते .

Comments