१३ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची संभाव्य पोट निवडणूक-२०२३ होण्याची शक्यता

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे चंद्रपूर लोकसभा पोट निवडणुकी संबंधित पत्रव्यवहार.

फक्त बातमी 
चेतन लूतडे 

चंद्रपूर- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर २जून ला  निघालेल्या लेखी आदेशानुसार लगेचच पोटनिवडणूक होण्याचे चिन्ह दिसत आहे.
पत्र क्रमांक : बीवायई- २०२३/प्र.क्र.३७६/२३/३३. नुसार सामान्य प्रशासन विभागला पोट निवडणुकी संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आले असून निवडणूक तारीख लवकरच जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

१३ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची संभाव्य पोट निवडणूक-२०२३ संदर्भात
निवडणूकीचे साहित्य उपलब्ध करून देणेबाबत. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

१३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान सदस्य श्री. बाळूभाऊ नारायण धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे सदर रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत नजीकच्या काळात निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच सदर निवडणूकीचे संचलन करण्याकरिता या कार्यालयामार्फत खालील साहित्याचा पुरवठा करण्यात येईल.

१. शपथपत्र (Form २६ )
२. नामनिर्देशन पत्र (Form २A)
3. Form A and Form B
४. निवडून आलेल्या उमेदवाराला
५. बोटाला लावायची शाई द्यावयाचे प्रमाणपत्र (Form२२)
६. सुधारित पिंक पेपर सील 
७. सुधारित  ग्रीन पेपर सील

१३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे

निवडणूक साहित्य आहे किवा कसे याबाबत तात्काळ आढावा घेण्यात यावा. तसेच ज्या साहित्याची आवश्यकता आहे याबाबतची अंदाजित मागणी या कार्यालयाकडे करण्यात यावी.

या आशयाचे पत्र अ. अ. खोचरे ,कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, यांच्या सहीचे संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.

त्यामुळे चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रात लवकरच पोट निवडणूक लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments