वरोरा : उपविभागीय अधिकारी वरोरा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या माजरी येथे भूमिपुत्रांना न्याय, प्रदूषण थांबवणे, सी एस आर फंडाचा परिसरातील गावांना लाभ द्यावा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या घेऊन शिवसेना (ठाकरे) गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी उद्या सोमवार दि ५ जून रोजी माजरी येथे मोर्चा व काम बंद आंदोलनचे आयोजन केले आहे.
वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अधिकार क्षेत्र देणाऱ्या भद्रावती तालुक्यातील माजरी येथे वेकोली कडून स्थानिक भूमिपुत्र व शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय सुरू आहे.परिणामी विविध मागण्यांसाठी वेकोली प्रशासान,एन.सी.सी कंपनी व के.जे सिंग कंपनी विरोधात धडक मोर्चा आणि कामबंद आंदोलनचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या या मोर्चाच्या निमित्ताने
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा,
परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून गुन्हेगार स्वरूपातील कामगारांना राज्याबाहेर पाठवण्यात यावे,
कोळसा वाहतूक सुरु असतांना प्रदूषण रोखण्याची प्रभावी उपाययोजना करवी,
कोळसा वाहतुकीमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यात यावी, सीएसआर
फंडातुन परिसरातील गावांना मदत द्यावी, कोळसा खाणीतून उत्खनना दरम्यान निघणाऱ्याओबीचे ढीग तयार झाले असून यामुळे पावसाळ्यात पूर संकट येण्याची शक्यता असल्याने त्यावर त्वरित उपाययोजना करावी,कोळसा खान परिसरातील गावांचे रस्ते वेकोली ट्रास्पोर्टिंग करीता वापरत असल्याने ते संपूर्ण रस्ते खराब झाले असून त्याचे सिमेंट करण करण्यात यावे,
कोळसा खानितुन होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करावी यासह अन्य मागण्या घेऊन मागण्या घेऊन २७ तारखेपासून स्थानिक पदाधिकारी यांचे आंदोलन सूरु आहे.परंतु निगरगट्ट विकोली प्रशासनाने याची अद्याप दखल घेतली नाही.यामुळे सदर मोर्चाच आयोजन केले आहे.
परिसरातील सर्व गावकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित उपस्थित राहावे असे आव्हान
मनीष जेठाणी
युवासेना जिल्हा प्रमुख,अमित भारतराव निब्रड शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी केले आहे.
Comments
Post a Comment