कोविड लसीकरण लस मोफत देण्याचे धाडस केवळ मोदी सरकारच करू शकते डॉक्टर सागर वझे

कोविड लसीकरण लस मोफत देण्याचे धाडस केवळ मोदी सरकारच करू शकते  डॉक्टर सागर वझे

मोदी @9  कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियान वरोरा येथे संपन्न

वरोरा २८/६/२०२३
चेतन लूतडे 

        नरेंद्र मोदी सरकार केंद्रात आल्यापासून मागील नऊ वर्षांमध्ये वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये 500 टक्क्यांनी वाढ झाली. देशाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा वेग दररोज 12 किलोमीटर वरून 37  किलोमीटर प्रत्येक दिवसाला झाला. आज सर्व सुविधांनी युक्त असे रस्त्यांचे जाळे देशांमध्ये पसरलेले आहे, याचे श्रेय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारलाच आहे असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार डॉक्टर कल्पना सैनी यांनी वरोरा येथे केले. मोदी @9  कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानामध्ये त्या उद्बोधन करीत होत्या 
        मेक इन इंडिया हे धोरण केंद्र सरकारने अवलंबल्यापासून देशाने मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात प्रगती केली. भारतात प्रथमच पुरुषांमागे महिलांची संख्या वाढली असून प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोट्यावधी लोकांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित असून देश सुरक्षित असल्याचे सांगत 2014 पासून कोणत्याही मोठ्या शहरात दहशतवादी हल्ला झालेला नाही. 126 जिल्ह्यांपैकी फार कमी जिल्हे आज नक्षलग्रस्त प्रभावित असून ही मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. जनधन योजनेतील प्रत्येक पैसा आज लाभार्थींच्या खात्यात जमा होत असून डिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आल्याचेही  ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले.
  नरेंद्र मोदी यांच्या काळात कोविडग्रस्तांना दिलेल्या लसीचा उल्लेख करत 200 कोटी लस लोकांना मोफत लस देण्याचे धाडस केवळ मोदी सरकारच करू शकते . 
डिजिटल बँक खाते उघडल्याने गरीब जनतेचे पैसे थेट खात्यात जमा झाले.
कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी 200  कोटी डोजेस वॅक्सिंग मोफत जनतेला दिले. 

लगभग पूर्ण भारतामध्ये पंधरा हजार करोड रुपयाचे व्हॅक्सिन जनतेसाठी मोफत केले.
भारताचे जगामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले.

 काश्मीर मुद्दा ,अयोध्या राम मंदिर, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केलेली नोटबंदी, गरिबांसाठी लाखो घर बांधण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना, नागपूर सारखी स्मार्ट सिटी, मुद्रा लोन योजना अशा बऱ्याच माध्यमातून जनतेपुढे मोदी सरकारने छाप सोडली असून येणाऱ्या काळात मोदी सरकार विकासात्मक काम करेल असा विश्वास डॉक्टर सागर वझे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मंचावर ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर ,भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ भगवान गायकवाड, शहराध्यक्ष सुरेश महाजन, बाबा भागडे, माजी नगराध्यक्ष अहतेश्याम अली, माजी नगरसेविका सुनीता काकडे, पंचायत समितीच्या माजी सभापती रोहिणी देवतळे, करण देवतळे, जिल्हा परिषद चे माजी सभापती राजू गायकवाड, भाजपचे पदाधिकारी रमेश राजुरकर, डॉ सागर वझे, नरेंद्र जिवतोडे ,उमेश बोडेकर, चंद्रकांत गुंडावार आदींची उपस्थिती होती 
कार्यक्रमाचे संचालन राजीव दोडके यांनी तर प्रास्ताविक अहतेश्याम अली यांनी केले. संमेलनाला  व्यापारी, डॉक्टर्स ,प्राध्यापक, इंजिनीयर, कामगार संघटना, आधी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Comments