वेकोलीच्या तक्रारीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांची अंबादास दानवेंकडून दखल

वेकोलीच्या तक्रारीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांची अंबादास दानवेंकडून दखल 
*चंद्रपुरात येऊन प्रश्न मार्गी लावणार 
 वरोरा :  माजरी येथे भूमिपुत्रांना न्याय, प्रदूषण , सीएसआर फंडाचा परिसरातील गावांना लाभ  या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या घेऊन शिवसेना (ठाकरे) गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी सोमवार दि ५ जून रोजी माजरी येथे मोर्चा व काम बंद आंदोलन केल्या प्रकरणी वेकोलीच्या तक्रारीवरून माजरी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. तेंव्हा त्यांनी यावर छेद व्यक्त करून चंद्रपुरात येऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे .
वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील माजरी येथे वेकोली कडून स्थानिक भूमिपुत्र व शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय सुरू आहे.परिणामी विविध मागण्यांसाठी वेकोली प्रशासान,एन.सी.सी कंपनी व के.जे सिंग कंपनी विरोधात धडक मोर्चा आणि कामबंद आंदोलनचे आयोजन ५ जून रोजी शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनातून 
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार,
परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि गुन्हेगार स्वरूपातील कामगारांना राज्याबाहेर पाठविने,
कोळसा वाहतूक दरम्यान प्रदूषण रोखण्याची प्रभावी उपाययोजना ,
कोळसा वाहतुकीमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई , सीएसआर
 फंडातुन परिसरातील गावांना मदत , कोळसा खाणीतिल ओबीच्या ढिगांमुळे पावसाळ्यात पूर संकट येण्याची शक्यता असल्याने त्यावर त्वरित उपाययोजना ,कोळसा खान परिसरातील रस्ते वेकोली ट्रास्पोर्टिंग करीता वापरत असल्याने ते खराब झाले असून त्याचे सिमेंट करण,
कोळसा खानितुन होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करावी यासह अन्य मागण्या विकोली प्रशासनापुरे ठेवण्यात आल्या होत्या.दि मे २७ पासून स्थानिक पदाधिकारी यांचे आंदोलन सूरु आहे.परंतु निगरगट्ट विकोली प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. या आंदोलनामुळे कोळशाची वाहतूक अडवून धरल्याचा आरोप करीत वेकोली प्रशासनाने माजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. या संदर्भातील तक्रार चंद्रपूर जिल्हा शिवसेना(ठाकरे) प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी शिवसेना(ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे मुंबई भेटीदरम्यान केली. याची दखल घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय व हक्क  व यासाठी लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबाबत खेद व्यक्त केला. तसेच याबाबत जाब विचारण्याकरिता तसेच प्रश्न मार्गी लावण्याकरता याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रपुरात येण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिले आहे.
नमस्कार,  
श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, येन्सा, टेमुर्डा.
आजचे बाजार भाव 

कपास-- 7202
 
सोयाबिन-4851

तुअर  ___9201

चना--   4801

( आर्द्रता 10 %  )
पर्यंत ... 
धन्यवादh
============== =========================
टीप :- नगदी रक्कम(चुकारा) करिता सातबारा 
अनिवार्य आहे.
धन्यवाद...................

Comments