टेंमूर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वरोरा
चेतन लूतडे
बुद्ध पौर्णिमा आणि एक मे कामगार दिवस तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 मे ला ग्रामपंचायत भवन टेंमूर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक श्री धीरज दारुडे गुरुजी संत तुकडोजी विद्यालय टेंभुर्डा, आशिष जांभुळे गट ग्रामपंचायत पाचगाव ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष किशोर भाऊ डुकरे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी प्रहार तालुका अध्यक्ष वरोरा यांनी केली असून ब्लड बँक टीम नागपूर येथून बोलवली असून कार्यक्रमांमध्ये ५१ दात्यांनी रक्तदान आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजू जी तिखट विविध कार्यकारी सोसायटी टेंभुर्डा अध्यक्ष, राजूभाऊ आसुटकर, विविध कार्यकारी टेंभुर्डा संचालक, अरुणजी बरडे सामाजिक कार्यकर्ते मोवाडा, श्री खापणे सर मुख्याध्यापक संत तुकडोजी विद्यालय टेंभुर्डा, या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे म्हणून, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा श्री सतीश शेंडे साहेब, तथा सर्व वन कर्मचारी वरोरा टेमूडा कार्यलय, श्री अविनाशजी मेश्राम साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेगाव बु यांनी आपली विशेष हजेरी राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच अपास एनजो चे संस्थापक विशाल भाऊ मोरे यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची अधिक शोभा वाढवली सर्व रक्तदात्याचे शिबीर आयोजका कडून आभार मानले जात आहे
Comments
Post a Comment