सोमनाथची श्रमसंस्कार छावणी युवकांसाठी श्रम विद्यापीठ. गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांची भेट.
गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे यांची भेट.
चेतन लूतडे
वरोरा 17/5/23
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी 1968 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल जवळील सोमनाथ या गावात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात केली होती. हे वटवृक्ष आता मोठे झाले असून यावर्षी 54 वी छावणी मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या छावणीमध्ये लहान मुलापासून तर वयोवृद्ध महिला व पुरुषांचा सहभाग दर्शवला असून भर उन्हाळ्यात भारतातील वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या तरुण वर्गातील मुलांचा उत्साह बघण्यासारखा आहे.
वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या निसर्गरम्य स्थळी सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरला ध्येयवेडे तरुण आवर्जून येत असतात. या वयात उन्हाळ्याच्या सुट्ट्या थंड हवेच्या ठिकाणी बरीच विद्यार्थी घालवीत आहेत. मात्र आपण आपल्या मातृभूमीसाठी काही देणे लागतो. मानवतेची साखळी करून मदतीचा हात पुढे करू शकतो या उदंड भावनेने जमा झालेली तरुणाई सोमनाथ याच ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळेच प्रत्येक वर्षी भारतातील बहुतांश मित्र परिवार या ठिकाणी जमा होतात. आणि आयुष्यातील संस्काराचे बाळकडू याच छावणीतून समाजात घेऊन जातात.
देशातील विविध ठिकाणावरून आलेले मान्यवर आपले मनोगत व अनुभव या ठिकाणी शेअर करतात. नवीन मित्रांची ओळख सुद्धा याच ठिकाणावरून होत असते.त्यामुळे या श्रमसंस्कार छावणीला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
छावणीत महाराष्ट्र, ओडीसा, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील जवळपास २७५ शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. श्रम ही श्रीराम है... आणि हाथ लगे निर्माण मै...नही मारणे नही काटने या बाबांच्या विचारानुसार आज सकाळी सोमनाथ प्रकल्पातील शेतशिवारामध्ये शिबिरार्थीनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे, शेतातील दगड उचलणे , रस्ता तयार करणे, इत्यादी कामे करून श्रमदान करण्यात येते.
श्रमसंस्कार छावणीमध्ये श्रमदान, बौद्धिक सत्र, मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा दैनदिन कार्यक्रम 22 मे पर्यंत चालणार आहे. सोमनाथ येथील छावणीला सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे, समीर हक्के यांनी सुद्धा आवर्जून भेट दिली. व सोमनाथ येथील परिसरा बद्दल माहिती जाणून घेतली.
श्रमसंस्कार छावणीचे मुख्य संयोजक महारोगी सेवा समितीचे डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात भारत जोडोचे सहयात्री एम. मुदलवन, सहसंयोजिका पल्लवी आमटे, छावणी समन्वय रवींद्र नलगंटीवार, भारत जोडोचे सहयात्री सोमनाथ रोडे, डॉ. अशोक बेलखोडे, दगडू लोमटे, अजय स्वामी, शकील पटेल, सोमनाथ प्रकल्पाचे कार्यकर्ते अरूण कदम आदी स्वयंसेवक उपस्थित होते.
Comments
Post a Comment