कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

७ दिवसात मागण्या निकाली काढा अन्यथा लोटांगण आंदोलन

विविध समस्या घेऊन प्रहारचे तहसीलदारांना निवेदन

तहसीलदारांना कापूस भेट

७ दिवसात मागण्या निकाली काढा अन्यथा लोटांगण आंदोलन

वरोरा 

वरोरा तालुक्यातील विविध समस्या घेऊन प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी  ७ वर्षांपासून ट्रामा केअर ची इमारत  रुग्णाविना आजारी पडली आहे.  यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदभरती भरून तात्काळ सुरु करावी. कापसाला ७ हजार रुपये भाव देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. अवैध रेती तस्करांच्या वाहनाने रस्ताची वाट लागली. आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार स्नेहल रहाटे यांना देण्यात आले. यावेळी निवेदन कर्त्यांनी तहसीलदार यांना कापूस भेट देत ७ दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास तहसील कार्यालय ते ट्रामा केअर पर्यंत लोटांगण आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 
    निवेदन देतांना प्रहारचे तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते



श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, येन्सा, टेमुर्डा.
आजचे बाजार भाव 

कपास-- 6950

सोयाबिन-4621

तुअर  ___8001

चना--   4551

चनोली--5500

लाखी--3100

( आर्द्रता 10 %  )
पर्यंत ... 
धन्यवाद
============== =========================
टीप :- नगदी रक्कम(चुकारा) करिता सातबारा 
अनिवार्य आहे.
धन्यवाद...................

Comments