वरोरा येथील 11 योगपटूची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

वरोरा येथील 11 योगपटूची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील योग व मेडिटेशन इन्स्टिट्यूट वरोरा यांच्या वतीने योग प्रशिक्षण शिबिर वरोरा येथे राबवल्या जाते.

योग कल्चर असोसिएशन महाराष्ट्र संलग्नित सातारा जिल्हा वाई तालुका योगा कल्चर असोसिएशन यांच्यावतीने एप्रिल 30 तारखेला बारावी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आली होती. 
यामध्ये वरोरा येथील योग पटूंनी आपले कौशल्य दाखवीत राज्य पातळीवर  ठसा उमटवला आहे. 
 *रिदमीक योगा जोडी मुले* यामध्ये
रौनाक आमटे व राम झाडे

 *रिदमिक योगा जोडी मुली* यामध्ये
सरस्वती मिटकर व गायत्री पाॅल

 *आर्टिस्ट जोडी मुली* 
साई नेवासकर व स्वर्णीका नौकरकार

 *आर्टिस्ट एकल मुले* 
शौकत आमटे साहिल खापणे व राम झाडे

 *ट्रॅडिशनल योगा मुले दहा ते पंधरा* 
राम झाडे
 *ट्रॅडिशनल योगा मुली दहा ते पंधरा* 
 स्वर्णिका नौकरकार

 *ट्रॅडिशनल योगा मुली दहा ते वीस* 
स्वर्णीका मिटकर व गायत्री पॉल

या सगळ्यांची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध योगा प्रकारामध्ये निवड झाली असून बंगाल येथे या स्पर्धा पार पडणार आहेत . त्यासाठी प्रशिक्षक अनिकेत ठक व स्वप्निल पोहनकर हे असणार आहे.त्यांच्या शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments