खाजगी ट्रॅव्हल्स DNR आणि ट्रकचा अपघात *पाच जखमी

खाजगी ट्रॅव्हल्स DNR आणि ट्रकचा अपघात 
*पाच जखमी 

वरोरा : चंद्रपूर कडून नागपूरकडे भरधाव निघालेल्या डीएनआर  खाजगी ट्रॅव्हल्सने आज रविवारी दुपारी २:३० च्या सुमारास वरोराकडून वणीकडे निघालेल्या ट्रकला नंदोरी येथील उडानपूला जवळ धडक दिली. या अपघातात बस चालक आणि क्लीनर आणि अन्य असे पाच जण जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी बस चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर येथून नागपूरकडे निघालेल्या डीएनआर या खाजगी ट्रॅव्हल्स बसने नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील नंदोरी येथील उडान पुलाजवळ वरोरा कडून वणी कडे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात बस चालक शुभम रमेश पोलपोलवर  व अतुल ठाकरे,प्रतीक रविंद आलम, अश्विनी शंकर मेश्राम आणि अन्य एक असे पाच जखमी झाले त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले.  
नागपूरकडे जाणाऱ्या बसने उडान पुलावरून जायचे होते परंतु तसे न करता बस चालकाने उडानपुला खालून भरधाव वेगाने बस आणली आणि त्याच दरम्यान वरोऱ्याकडून उडानकुलाच्या खालून वनी मार्गे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसचा पुढील भाग क्षतीग्रस्त झाला .तसेच ट्रकचा ट्रकला देखील मोठे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची नोंद घेतली आणि बस चालकावर  गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत

Comments