वरोरा येथील कपडा व्यवसायिक योगेश डोंगरवार यांचा स्तुत्य - उपक्रम
वरोरा २०/४/२३
चेतन लुतडे
वरोरा येथील योगेश डोंगरवार यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत आनंदवनातील दिव्यांग बांधव (अंध, मुक बधिर विज्ञार्थि ) यांचे सोबत वाढदिवस साजरा करीत समाजात एक आदर्श निर्माण केला.
आपला वाढदिवस आला की, आपल्या समोर येतात आपले मित्र,परिवारांसोबत महागडी हॉटेल मध्ये पार्टी, या पाश्यात्य संस्कृतीमुळे तरुण पिढी भारतीय संस्कृती विसरत चालले असून यामुळे समाजात या संस्कृतीमुळे दुष्परिणाम होतांना दिसत आहेत. याच पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत मार्गदर्शकांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादरूपी शुभेच्छाने व्यवसायिक योगेश डोंगरवार यांनी आपला ४२ वा वाढदिवस सोहळा मुक-बधीर शाळा आनंदवन येथे संपन्न करून आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार प्रदान केला. या वाढदिवस कार्यक्रमाला दादा भाऊ जयस्वाल ,श्री ठक सर ,उप-सरपंच आनंदवन ,शौकत भाई, नरेंद्र नेमाडे,मनोज कोहळे,अभिजीत गमे ,रूपेश दुगड,मंगेश वानखडे गणपत भडगरे, क्रिष्णाजी डोंगरवार
मान्यवर आप्त व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.
सोहळ्याची सुरुवात वाढदिवसाचा केक दिव्यांग बांधवांच्या हस्ते कापून करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगेश भाऊ यांच्या आदर्शवादी कार्याला शुभेच्छा देत त्यांच्या कार्यात नेहमी सहभागी राहू असे म्हणत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या
वाढदिवसानिमित्त योगेश डोंगरवार मित्र परिवाराकडून वाढदिवस भेट स्वरुपी
सध्या असनारा धगधगता उन्हाळा आणी समोर येनारा पावसाळा दोन्ही ऋतु मध्ये उपयोगी अशी छत्री,पेन्स,बुक्स आणि अनेकानेक खाऊ अशी कीट वाटन्यात आली त्याबद्दल श्री भसारकर सर यांनी परिवाराचे आभार मानून अशाप्रकारे योगेश डोंगरवार सत्कार्याच्या प्रेरणेतून असाच आदर्श समाजांनी ठेवावा असे विचार व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोलक सर व आभार प्रदर्शन पराग पत्तीवार , अध्यक्ष, रोटरी क्लब वरोरा यांनी केले.
शेतकर्याचे एक मत नितिन मत्ते साठी
Comments
Post a Comment