कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

जंगली निलगायला अपासद्वारे जीवनदान

जंगली निलगायला अपासद्वारे जीवनदान

विशाल मोरे
वरोरा 

वरोरा शहरांतील चीर घर प्लॉट  मध्ये जखमी अवस्थेत नीलगाय फिरत असल्याचे अपास संस्थेच्या सदस्याला फोनवर माहिती मिळाली असता संस्था चे सदस्य  तसेच वनविभाग कमर्चंरी शोध घेत पाठलाग करत  त्याला मोठ्या प्रयत्नाने निलगायला पकडण्यात आले .
नीलगायचा एक पाय  मोडला असल्याचे दिसले. वनविभाग व अपासनच्या मदतीने निलगायला पकडण्यात आले. व नीलगायच्या उपचारासाठी चंद्रपूर ttc मध्ये पाठवण्यात आले.
त्यावेळेस अपास संस्थेचे रेस्क्यू टीम चे विशाल मोरे,पंकज खाजोने,हर्षल मोटके,बंटी खडके,अमित ननावरे, शुभम भगत, सूरज दुबे तसेच वरोरा वनविभाग चे संजय खोब्रागडे, जितेंद्र लोणकर, संदीप वाटेकर, अमोल नेवारे, भिवंदरे मदम उपस्थित होते

Comments