वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपा आघाडीला ९ तर काँग्रेसला ८ जागा *एक जागा शिंदे गटाला

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपा आघाडीला ९ तर काँग्रेसला ८ जागा 
*एक जागा शिंदे गटाला 
वरोरा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीच्या काल झालेल्या  मतदानाची आज २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून दिनेश महादेव कष्टी, डॉक्टर विजय रामचंद्र देवतळे, जयंत मोरेश्वर टेंभुर्डे, अभिजीत पावडे, दत्ता बोरेकर, विठ्ठल भोयर हे विजयी घोषित करण्यात आले. तर शिंदे गटाचे नितीन मत्ते यांना ४५२ मते मिळाली. या गटात ७९ मते बाद ठरविण्यात आली हे विशेष.

 महिला गटात संगीता वासुदेव ऊरकांदे आणि कल्पना टोंगे यांनी बाजी मारली. तर इतर मागासवर्गीय गटात राजेश वामनराव देवतळे आणि विभा /भटक्या जमाती गटात विलास झिले यांनी बाजी मारली. 
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटांमध्ये गणेश चवले राजेंद्र चिकटे, हरीश जाधव, पुरुषोत्तम पावडे, यांनी बाजी मारली या गटात ३७ मध्ये बाद ठरविण्यात आली. अडते / व्यापारी गटात नीरज गोठी आणि प्रवीण मालू यांनी विजय मिळवला. तसेच हमाल/ मापारी गटात पांडुरंग झाडे यांनी विरोधकावर मात केली.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात भाजपा, राष्ट्रवादी, मनसेचे राजूरकर,ठाकरे गटाचे रवी शिंदे व काँग्रेसचेच डॉ विजय देवतळे अशा सर्व विरोधकांनी एकत्र येऊन शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी तयार केली होती. तर  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शेतकरी एकता पॅनलच्या माध्यमातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदार-आमदार गटाकडून टाकण्यात आलेले शेतकरी विकास पॅनल आणि भाजपा आघाडीचे शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी यांच्यातच खरी लढत झाली. आणि या लढतीत काँग्रेस समर्पित शेतकरी विकास आघाडी पॅनलला आठ तर भाजपा प्रणित शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीला नऊ जागा मिळाल्या तर एका जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नितीन मत्ते हे ४५२ मते घेऊन आघाडीवर होते.
 निर्णय अधिकारी म्हणून चंद्रपूर येथील श्रेणी-१ चे लेखापाल शिरीष गोडे यांनी काम पाहिले.

मात्र यानंतर सभापतीसाठी दावेदार असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असून कोणाचा सभापती बसेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकला चलो रे भूमिकेत असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नितीन मत्ते यांना दोन्ही पक्षातर्फे मनधरणी करत असून आता एकनाथ शिंदे गट कोणाकडे वळतो याचे लक्ष लागले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा फक्त बातमी, चेतन लूतडे 

 *सेवा सहकारी संस्था* 

१)डॉक्टर देवताळे  ४०१🍵
२)जयंत टेंमूर्डे ३४९🍵
३)बाळू भोयर २७६🍵
४)दत्ता बोरेकर २८१🍵
५)अभिजीत पावडे २७४🍵
६)दिनेश कष्टी २६१
७)नितीन मते २५२🛺

७९ बाद 

*महिल* 
८)कल्पना टोंगे☕३४३
९)संगीता वासुदेव🍵 उरकांदे३३२

३९बाद

*ओ बी सी*
१०)राजेश देवतळे☕४१९
55बाद
*अनुसुचित जमातीतील*
११)विलास  झिले☕432

 *ग्रामपंचायत* 
१२)गणेश चवले ☔275
१३)राजेंद्र चिकटे ☔284
बाद45

 *दुर्बल गट* 
१४)पुरुषोत्तम पावडे ☔298

बाद31

 *अनुसूचित जाती जमाती* 
१५)हरी जाधव 308☔

33बाद
 *व्यापारी गट* 
१६)नीरज गोठी ६५☔
१७)प्रवीण मालू६४☔

 *अडते हमाल* 
१८) पांडुरंग झाडे ३७☔


Comments