आयपीएल सट्टेबाजावर चंद्रपुरात कारवाई

आयपीएल सट्टेबाजावर चंद्रपुरात कारवाई

वरोरा

गेल्या पंधरा दिवसापासून
जिल्ह्याभरात आयपीएल  सट्टेबाजांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. चंद्रपूर येथील रामनगर  पोलिसांनी हवेली गार्डन व ओम भवन . परिसरातील विदर्भ प्लॉट ओनर्स येथील तिसऱ्या माड्यावर अशा दोन ठिकाणी रविवारी कारवाई करून तब्बल १६ लाख ३२ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच जणांना अटक केली.

 तर फरार दोघांचा तपास सुरू आहे. हवेली गार्डन परिसरातील कारवाईत रोहन प्रकाश कांबळे (२३) रा. हवेली गार्डन याला अटक केली. तर अरबाज कुरेशी रा. हवेली गार्डन हा फरार आहे. 
तर ओम भवनच्या बाजूला केलेल्या कारवाईत
आसिफ रहीम शेख (३४)
रवी मोहन गंधारे (३२),
दिनेश लक्ष्मण कोल्हे (३३),
गणेश नंदकिशोर जानवे (२५) 
सर्व राहणार वरोरा हल्ली मुक्काम चंद्रपूर असे अटकेतील आरोपींची नाव आहे. तर छोटू उर्फ रूपचंद यादव राहणार मांजरी हा फरार आहे.

रविवारी रामनगर पोलिसांनी हवेली गार्डन येथे कारवाई करून रोहन कांबळे याला अटक करीत टीव्ही, गाडी, मोबाइल, सट्ट्याचे साहित्य असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ओम भवनाच्या बाजूला विदर्भ प्लॉट ओनर्स तिसरा माढा राहणार वरोरा हल्ली मुक्काम स्वप्निल बोरकर यांच्या प्लॉट क्र.तिन डी दहा टाकून एक लॅपटॉप पाच मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 14 लाख 22 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
 पथकाने केली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली . तर एकजण फरार आहे. ही कारवाई रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे, ठाणेदार लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनात एपीआय हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने केली.

वरोरा शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात आयपीएल सट्टेबाज सक्रिय झाले असून यांच्यावर सुद्धा उपविभागीय अधिकारी नोपानी यांची दहशत असून हे सर्व सट्टेबाज बाहेर गावात जाऊन आपल्या गिऱ्हाकासोबत देवाण-घेवाण करीत असल्याचे चित्र आहे यामध्ये मोबाईल ॲप द्वारे हा सट्टा बाजार खेळला जातो. या सगळ्यांची लिंक वनी येथील एका नामांकित व्यक्तीसोबत असल्याचीही चर्चा आहे. मात्र पोलीस सुद्धा त्यांचा शोध घेत असून आयपीएल सट्टे बाजारावर वरोऱ्यात पोलिसांचे नियंत्रण आहे.

किशोर भाऊ टोंगे सामाजिक कार्यकर्ते



Comments