वरोरा शहरात वादळी वाऱ्यांसह गाराचा पाऊस

वरोरा शहरात वादळी वाऱ्यांसह गाराचा पाऊस

वरोरा२२/४/२३
चेतन लूतडे

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात दुपारी चार वाजता च्या दरम्यान अचानक वातावरणात बदल घडून आला. अनेक ठिकाणी मेघगर्जनासह पावसाने हजेरी लावली. पावसासह गारा पडल्याने वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला होता.
एप्रिल महिन्यातील कडक उन्हामध्ये गारांचा पाऊस पाहून बहुतांश मुलांनी आनंद लुटला. यावेळेस घरातील लहान मुले बर्फासोबत खेळताना दिसली. पावसाच्या सरी अर्धा तास पडत होत्या सध्या कुठेही हानी नसून 
वातावरणामध्ये पुन्हा बदल झाला. वरोरा शहरातील वातावरणात इंद्रधनुष्य निघाल्याने वरोऱ्यातील वातावरण आल्हाददायक झाले होते. 

Comments